पुणे: पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी (पुणे) चे विशेष पोलिस महानिरीक्षक व संचालक डॉ. राजेंद्र बा. डहाळे यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. डॉ. डहाळे यांना यापूर्वीही 2017 मध्ये नंदूरबार पोलिस अधीक्षक असताना राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले होते. (President's Police Medal)
डॉ. डहाळे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांनी पुणे शहरात सायबर पोलिस उपायुक्त म्हणूनही कार्य केले आहे. सायबर फॉरेन्सिक लॅबच्या निर्मितीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी पुण्याचे अपर पोलिस आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला आहे. याकाळातील गणेशोत्सव व इतर कायदा व सुव्यवस्था उत्तमपणे सांभाळल्याबद्दल त्यांचा वरिष्ठ अधिकार्यांनी वेळावेळी सन्मान केला. डॉ. डहाळे यांनी यापूर्वी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग व इतर विभागात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. (President's Police Medal)