शिवराज्याभिषेकाचे पोस्टाकडून विशेष आवरण

शिवराज्याभिषेकाचे पोस्टाकडून विशेष आवरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय डाक विभागामार्फत गुरुवारी विशेष आवरण कार्यक्रम पुणे प्रादेशिक विभागाचे पोस्टमास्तर रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते जीपीओ येथे पार पडला. विशेष आवरणाचा समावेश असलेला प्रथम अल्बम जायभाये यांनी इंटरनेशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेयर आयटम्सचे अध्यक्ष किशोर चांडक यांना सुपूर्त केला.

या कार्यक्रमास प्रवर अधीक्षक डॉ. अभिजित इचके, इंटरनेशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्सचे सचिव शरद बोरा तसेच विविध भागांतून आलेले टपाल तिकीट संग्रहक, डाक विभागाचे इतर कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. या वेळी जायभाये यांनी टपाल विभागाच्या विविध योजनांवर त्यांनी दृष्टिक्षेप टाकला व आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय टपाल विभागाचे योगदान कसे महत्त्वपूर्ण आहे, ते नमूद केले.

अनावरण झालेल्या विशेष आवरणाच्या मुखपृष्ठाच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र, रायगड किल्ल्याचे छायाचित्र आणि राज्याभिषेकावेळी वापरण्यात आलेले होन (नाणे) हे चित्रित करण्यात आलेले आहे. सिंहगड किल्ल्यावरून घोड्यावर स्वार होऊन दत्ता पाडळे यांनी हे विशेष कव्हर पुणे जीपीओ येथे आणले. या विशेष कव्हरवर जारी करण्यात आलेले कॅन्सलेशन सोनेरी असून, त्यावर शिवमुद्रा चित्रित करण्यात आली आहे. हे विशेष टपाल आवरण डाक विभागाच्या संकेतस्थळावर तसेच महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील फिलॅटेलिक ब्युरोमध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news