निरेतील गर्भपातापूर्वी लोणीकंदमध्ये सोनोग्राफी

निरेतील गर्भपातापूर्वी लोणीकंदमध्ये सोनोग्राफी
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : निरेतील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील महिलेने सातार्‍यातील लोणीकंद येथील एका सोनोग्राफी सेंटरवर गर्भलिंग निदानासाठी सोनोग्राफी केल्याचे निदर्शनास आले आहे. मुलीचा गर्भ असल्याचे समजल्यावर निरेतील श्रीराम हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात आला. निनावी फोनवरून एक महिला निरेतील श्रीराम हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी येणार आहे, अशी माहिती प्रशासनाला मिळाली होती.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले पथकासह रविवारी सव्वाआठ वाजता तेथे पोहचल्यावर आदल्या दिवशी रात्रीच गर्भपात झाल्याचे समोर आले. डॉक्टरने असे कोणतेही प्रकरण आपल्याकडे घडले नसल्याचा बनाव केला. त्यानंतर रुग्णाला फोन करून शहानिशा केल्यावर डॉक्टरचे सत्य समोर आले.

'पीसीपीएनडीटी' कायद्यांतर्गत गर्भलिंग निदान करणे हा गुन्हा आहे. आरोपींवर कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही नागरिकाला गर्भलिंग निदानाची माहिती मिळाल्यास त्वरित आरोग्य विभागाकडे तक्रार करावी.

                                     – डॉ. नागनाथ यमपल्ले,
                                      जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news