

इंदापूर: 1 सप्टेंबरपासून दुधाच्या खरेदीदरात प्रतिलिटर एक रुपयाने वाढ केलेली असून, 3.5 फॅट 8.5 एसएनएफसाठी 35 रुपये प्रति लिटरप्रमाणे दुधाचा खरेदी दर झालेला आहे, अशी माहिती सोनाई ग्रुपचे अध्यक्ष दशरथदादा माने यांनी दिली आहे.
दुधाचा दर हा जगभरातील व देशभरातील दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारभावावर तसेच मागणी व पुरवठा यानुसार ठरला जातो सोनाई प्रकल्पांमध्ये नुकताच देशभरातील सर्वात जास्त उत्पादन क्षमता असलेला स्कीम मिल्क पावडर, होल मिल्क पावडर, डेअरी व्हाइटनर पावडर निर्मिती करणार्या पावडर प्लांटची सुरुवात झालेली आहे. (Latest Pune News)
रेनेट केसिन, अशीड केसिन, सोडियम केसिन, व्हे प्रोटीन पावडर (80 टक्के, 70 टक्के, 40 टक्के), फार्मा लॅक्टोज पावडर, इडेबल लॅक्टोज पावडर, परमिट पावडर, बटर आइल, चीजची सर्व प्रकारची उत्पादने, युएचटी (अल्ट्रा हाय ट्रीटमेंट) 6 महिने टिकण्याची क्षमता असलेले क्रीम दूध, फ्लेवर मिल्क, क्रीम तसेच दुधापासून तयार होणारे सर्व प्रकारची उत्पादने मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहेत. त्या माध्यमातून अनेक दुग्धजन्य पदार्थ जगभरातील अनेक देशांत निर्यात होऊन बाजारपेठेत विकली जात आहेत, असेही दशरथदादा मानेयांनी सांगितले.
शेतकर्यांच्या हितासह जनावरांसाठी परिपूर्ण आहार व जास्तीचे दूध उत्पादन व्हावे यासाठी दर्जेदार पशुखाद्य निर्मिती प्रकल्प व त्याच माध्यमातून शेतकर्यांनी पिकवलेल्या मकेला योग्य भाव व त्वरित पेमेंट सुविधा उपलब्ध आहे.
शेतकर्यांनी उत्पादन केलेल्या सोयाबीन पिकाला योग्य बाजारभाव व त्वरित पेमेंट मिळावे यासाठी 800 मेट्रिक टन क्रशिंग कपॅसिटी असलेला सोलवंट प्लांट व रिफायनरी प्रकल्प कार्यान्वित आहे. या सर्व बाबींमुळे हजारो युवक व महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. दूध धंद्यावर अवलंबून असलेले सर्व घटकांच्या हिताची जपणूक करण्याचे काम आजपर्यंत केलेले आहे.
शेतकरी बांधव व तरुणांनी जनावरांचे व्यवस्थित पालनपोषण करून त्याला आधुनेकतेची जोड देऊन जास्तीची शुद्ध दुधाची निर्मिती करावी, शेतीला पशुपालन हा योग्य धंदा आहे. आम्ही आपणास योग्य मार्गदर्शन, दुधाला योग्य बाजारभाव कोणत्याही परिस्थितीत दुधाचे स्वीकृती, वेळेत पेमेंट, जनावरांची तब्येत चांगली रहावी व त्यांना परिपूर्ण आहार मिळावा त्यातून जास्तीच्या दुधाची निर्मिती व्हावी यासाठी दर्जेदार पशुखाद्य पुरवठा तसेच आपण शेतीत पिकवलेल्या मकेला योग्य भावात खरेदी करणे व त्वरित पेमेंट अशा प्रकारच्या सुविधा देत आहोत, असेही दशरथदादा माने यांनी सांगितले.