

पुणे: पुण्यात सर्वप्रथम झालेल्या काँक्रीटच्या रस्त्यांपैकी एक सोमवार पेठेतील खडीचे मैदान ते पारगे चौक हा नानल शास्त्री नावाने ओळखला जाणारा रस्ता आज 18 वर्षांनंतरही मजबूत असल्याची माहिती प्रभाग क्रमांक 24 (ड) चे भाजपाचे अधिकृत उमेदवार गणेश बिडकर यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.
बिडकर नगरसेवक असताना 2007 साली या रस्त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. या रस्त्याच्या निर्माणाविषयी सांगताना बिडकर म्हणाले, “2007 पूर्वी मंगळवार पेठेत प्रायोगिक तत्त्वावर पुण्यातील पहिला सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्याच्या यशस्वी पूर्ततेनंतर सोमवार पेठेतही सिमेंट काँक्रीटचा रस्ता करावा, यासाठी गणेश मी महापालिकेत आग््राह धरला आणि निधी मंजूर करून घेतला.
” सोमवार पेठेतील ऐतिहासिक खडीचे मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापासून सुरू होणाऱ्या दक्षिणोत्तर रस्त्याची निवड केली. या डांबरी रस्त्याची पावसाळ्यात दुर्दशा होत असे. बिडकर यांच्या पुढाकाराने 2007 नंतर नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला. त्यानंतर आजपर्यंत तो उखडलेला नाही. हा रस्ता 18 वर्षे शाबूत राहिला आहे. याविषयी बोलताना स्थानिक नागरिक उद्धव मराठे म्हणाले, “आता सोमवार पेठेतील गल्ली- बोळात सिमेंटच्या रस्त्यांचे जाळे आहे. परंतु पेठेतील पहिला काँक्रीटचा रस्ता म्हणून आजही खडीचे मैदान ते पारगे चौक हा रस्ता ओळखला जातो.
आपला प्रभाग उत्तम कसा होईल, यासाठी बिडकर कायम आग््राही असतात. नागरिकांच्या गरजांची त्यांना उत्तम जाण आहे. नागरी समस्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी दीर्घकालीन सोयी-सुविधा देण्यावर त्यांचा भर असतो. गेल्या कार्यकाळात त्यांनी पुढाकार घेत शहरासाठी मोठ्या प्रकल्पांची योजना केली. म्हणून यंदा प्रभागाचा नव्हे, तर शहराचा नेता म्हणून नागरिक बिडकर यांच्याकडे पाहत आहेत.”
शहरासाठी जे जे उत्तम ते ते करण्याचा माझा कायम प्रयत्न असतो. सोमवार पेठेतील पहिला काँक्रीटचा रस्ता 2007 मध्ये केला होता. तो आजही मजबूत आहे. येत्या काळात प्रभाग क्र. 24 मध्ये आणखी मोठी कामे करायची आहेत. त्यासाठी नागरिकांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा द्यावा.
गणेश बिडकर, माजी सभागृहनेते, पुणे महापालिका