पुणे : सोमेश्वरने सभासदांकडून जुलमी शेअर्स कपात करू नये ; भाजप नेते दिलीप खैरे यांची मागणी

File photo
File photo
Published on
Updated on

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने वाढीव शेअर्सची रक्कम प्रति एकर एकऐवजी प्रति दोन एकर एक शेअर्स यानुसार तीन हप्त्यांत कपात करावी. कोणत्याही परिस्थितीत जुलमी कपात करून सभासदांना भरडू नये, अशी मागणी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि भाजप नेते दिलीप खैरे यांनी केली आहे. याबाबत खैरे यांनी कारखान्याला निवेदन दिले असून, यात म्हटले आहे की, सोमेश्वर कारखान्याने मागील हंगामात 15 हजार रुपये प्रति शेअर्स, यानुसार भागातील वाढीव निधी जमा करण्यासाठी काही रक्कम सभासदांच्या ऊस बिलामधून कपात केलेली असून, उर्वरित या हंगामात कपात करणार आहेत.

सोबतच कारखान्याचे डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण प्रस्तावित आहे. म्हणून मागील तीन हंगामांतील ऊस लागवडीची सरासरी काढून प्रति एकर एक शेअर्स, यानुसार सभासद शेतकर्‍यांना कपातीचे पत्र देऊन चालू हंगामातील ऊसबिलामधून एकरकमी शेअर्सची रक्कम कपात होत आहे. वास्तविक, ज्या डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पासाठी भागभांडवल उभारणीसाठी कपात केली जात आहे, त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने स्व:गुंतवणूक फक्त 5 टक्के इतकीच माफक करावी, अशा प्रकारचा निर्णय यापूर्वीच घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

सोमेश्वर कारखान्याला या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारणीसाठी अशाप्रकारे जुलमी एकरकमी कपात करून निधी उभारणीची आवश्यकता नाही. याबाबत कारखानास्तरावर सभासद शेतकर्‍यांनी मागणी न करता कारखाना हा निर्णय मागे घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आपण याबाबत निर्णय घेत नसल्याने या वर्षी ऊस उत्पादन घटले आहे. सभासद आर्थिक अडचणीत आहेत. अशावेळी शेअर्सकपात, सोसायटी आणि बँक कर्जवसुलीची होणारी कपात, यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामाची पूर्वतयारी आणि आपली नियमित गरज पूर्ण करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक असल्याने वाढीव शेअर्स प्रति एकर एकऐवजी प्रति दोन एकर एक शेअर्स, यानुसार आणि वाढीव शेअर्स रकमेची कपात किमान तीन हप्त्यांत कपात करण्याचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी खैरे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news