पुणे : रेल्वेच्या काही गाड्या रद्द

पुणे : रेल्वेच्या काही गाड्या रद्द

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दौंड-मनमाड विभागात सुरू असलेल्या कामांमुळे रेल्वेच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काष्टी, बेलवंडी स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाची कामे दि. 20 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे-नागपूर, साईनगर शिर्डी- दादर, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र, निजामाबाद-पुणे, पुणे-भुसावळ-पुणे, पुणे-अजनी, नागपूर-पुणे, पुणे-निजामाबाद-पुणे रद्द करण्यात आली आहे. तर, पुणे-जम्मू झेलम एक्स्प्रेस पुणे-लोणावळा-पनवेल – कल्याण – इगतपुरी – मनमाडमार्गे धावेल.

मिरज-कोल्हापूर मार्गावरही ब्लॉकमुळे 21 ऑक्टोबर रोजी मिरज-कोल्हापूर पॅसेंजर, कोल्हापूर-मिरज, कोल्हापूर-सांगली व सांगली-मिरज रद्द राहणार आहे. पॅसेंजर ट्रेन कोल्हापूर-सातारा गाडी नियोजित वेळेवर मिरजेहून सातार्‍यासाठी सुटेल. पुढे ही गाडी रद्द राहील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news