…अन्यथा पुणे पालिका आयुक्तांविरोधात तक्रार ; जम्बो कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी सोमय्या आक्रमक

…अन्यथा पुणे पालिका आयुक्तांविरोधात तक्रार ; जम्बो कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी सोमय्या आक्रमक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शिवाजीनगर जम्बो सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्याकडे होते. त्यांच्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करूनदेखील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पीएमआरडीएचे आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्तांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा तुमच्याविरोधात तक्रार दाखल करेल, असा आक्रमक पवित्रा भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी घेतला आहे.

किरीट सोमय्या यांनी गुरुवारी दुपारी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेऊन झालेल्या हल्ल्याबाबत चर्चा केली. या वेळी सोमय्यासोबत भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. या प्रकरणात 28 जणांची ओळख पटली असून आणखी सात जणांचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या आमदारांच्या चौकशीबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, त्याबाबत बोलणे योग्य नसल्याचेही सोमय्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गरज भासल्यास पुणे पोलिसांच्या मदतीला
महाराष्ट्र पोलिस कोयता गँगच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जगदीश मुळीक यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेनंतर विशेष कृती योजना तयार केली जात आहे. पुणे पोलिसांना गरज भासल्यास त्यांच्या मदतीला महाराष्ट्र पोलिसदेखील उभे राहील, असे देखील सोमय्या म्हणाले.

महागाईचे कारण भ्रष्टाचार
महागाईसंदर्भात सरकार चिंतेत असून, कमी करण्याबाबत पावले उचलत आहे. महागाईचे कारण भ—ष्टाचार आहे. तसेच रशिया व युक्रेन युध्दामुळे पेट्रोलियम पदार्थांचे भाव अन्य देशांत वाढले असले तरी नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे आपण भाव स्थिर ठेवू शकल्याचे सोमय्या म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news