प्रशासकीय इमारतींवर सौर पॅनल गरजेचे : उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रशासकीय इमारतींवर सौर पॅनल गरजेचे : उपमुख्यमंत्री अजित पवार
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  बारामती शहर व तालुक्यात प्रशासकीय इमारतींचे प्रस्ताव तयार करताना यापुढील काळात प्रस्तावात सौर पॅनलचाही समावेश करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकार्‍यांना दिल्या. उपमुख्यमंत्री पवार यांनी रविवारी (दि. 28) बारामती परिसरातील विकासकामांची पाहणी केली. या वेळी त्यांनी हे निर्देश दिले. या वेळी अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते. तांदुळवाडी येथील रेल्वे अंडरपासचे काम करताना अपघात होणार नाही अशाप्रकारे वाहतुकीचे नियोजन करा. पावसाळ्यात पुलाखाली पाणी साचणार नाही, याबाबत दक्षता घ्या. पुलालगत सेवा रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करा, असेही पवार म्हणाले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत ग्रंथालयाच्या इमारतीचे काम करताना ग्रंथालयात पुरेसा सूर्यप्रकाश, हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा मिळतील, यादृष्टीने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कामे करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. बेघर नागरिकांना हक्काची पक्की घरे उपलब्ध करून देण्याबाबत नगरपरिषदेने विचार करावा. सार्वजनिक विकासकामे करताना गाळेधारकांना तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसनाची व्यवस्था करा, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याकरिता शादीखाना परिसरात उर्दू शाळा उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनील पावडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संचालक विश्वास गायकवाड, बसस्थानक आगारप्रमुख वृषाली तांबे, राष्ट्रवादीचे तालुकाध्?क्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव आदी या वेळी उपस्थित होते.

आचारसंहितेपूर्वी उद्घाटने
बर्‍हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालय, बारामतीचे सुसज्ज बसस्थानक आणि पोलिसांच्या गृहनिर्माण वसाहतीचे उद्घाटन पुढील महिनाभरात केले जाणार असल्याचे सूतोवाच अजित पवार यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच ही उद्घाटने होणार आहेत. त्यामुळे प्रशासन तयारीला लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news