Ujani Dam |आनंदाची बातमी : उजनी धरण निम्मे भरले

८३ टीएमसी पाणीसाठा
Water level in Ujani dam
उजनी धरणातील पाणी पातळी ५० टक्के झाली आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी जीवनदायनी ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांहून अधिक झाला आहे. उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. बुधवारी (दि.३१) दुपारी १२ वाजण्याच्या आकडेवारीनुसार उजनी धरण हे प्लस ५२ पूर्णांक ५८ टक्के झाले असून उजनीत एकूण ८१ पूर्णांक ८३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. आता उजनी १०० टक्के भरण्यासाठी केवळ १९ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

Water level in Ujani dam
Pune Porsche accident | पुणे पोर्शे अपघात प्रकरणी पुणे पोलिस सुप्रीम कोर्टात जाणार

शुक्रवारी (दि. २६) उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये आले होते. अवघ्या पाच दिवसांत उजनीत २७. ५९ टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. सध्या उजनीत दौंडहून २० हजार ८७४ क्युसेक इतका विसर्ग येत आहे.

Water level in Ujani dam
Pune Flood News : भीमा नदीकाठच्या पाणीपातळीत होतेय वाढ, हजारो एकर शेतीक्षेत्र पाण्याखाली

उजनीतील पाणीपातळी खालीलप्रमाणे

  • एकूण पाणीपातळी : ४९३.४६० मीटर

  • एकूण पाणीसाठा : ९१ .८३ टीएमसी

  • उपयुक्त साठा : ७८७.७७ मीटर

  • (२८.१७ टीएमसी)

  • टक्केवारी : ५२.५८टक्के

  • आवक : दौंड : २० हजार ८४७ क्युसेक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news