

पुणे : येत्या 15 ऑक्टोबरपासून सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन्ही मार्गांवर विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांची दीर्घ प्रतीक्षा संपणार असून, या विमानसेवेमुळे उद्योग, व्यवसायासह भाविकांना सोयीचे ठरणार आहे. (Latest Pune News)
दि. 15 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुंबई येथून या विमानसेवेचा शुभारंभ होणार आहे, तर बुकिंग 20 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. आठवड्यातील मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि
शनिवारी या दिवशी उपलब्ध असणाऱ्या या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई, तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी थेट आणि जलद हवाई संपर्क मिळणार आहे.
सोलापूर-मुंबई - प्रस्थान - दु. 12:55 वा.
मुंबई-सोलापूर - प्रस्थान - दुपारी 2:45 वा.
बंगळुरू-सोलापूर- प्रस्थान - सकाळी 11:10 वा.
सोलापूर-बंगळुरू- प्रस्थान - दुपारी 4:15 वा.