पुणे : कमी वजन, कमी दिवसांच्या बाळांसाठी ‘एसएनसीयू’ संजीवनी

पुणे : कमी वजन, कमी दिवसांच्या बाळांसाठी ‘एसएनसीयू’ संजीवनी
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कमी वजनाच्या किंवा कमी दिवसांच्या बाळांना स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट (एसएनसीयू) अर्थात नवजात शिशू अतिदक्षता विभागात उपचार दिले जातात. खासगी रुग्णालयांमध्ये एसएनसीयूमधील उपचारांसाठी हाच एका दिवसाचा खर्च पाच ते सहा हजार रुपये इतका येतो. कमला नेहरू रुग्णालयात 20 खाटांचे एसएनसीयू कार्यरत असून, गेल्या वर्षभरात 1426 बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे.

महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय, सोनावणे प्रसूतिगृह या तीन रुग्णालयांमध्ये निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट (एनआयसीयू) कार्यरत आहे. कमला नेहरू रुग्णालयात एसएनसीयू विभाग कार्यरत आहे. येथे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, फोटोथेरपी मशिन, रेडियंट वॉर्मर अशा सुविधा उपलब्ध आहेत.

कमी वजनाच्या, कमी दिवसांच्या बाळांना येथे आवश्यकतेनुसार एक ते दीड महिना उपचार दिले जातात. काही बाळांना जन्मत: कावीळ, शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणे किंवा कमी होणे, श्वसनाचे विकार, फिट्स येणे, हृदयाचा विकार, व्यंग अशा आजारांवर एसएनसीयूमध्ये उपचार केले जातात, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ आणि साहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता सांगडे यांनी दिली.

एनआयसीयूमधील उपचारांसाठी 'ट्रान्सफर प्लॅन'
नवजात बालकांना तातडीचे उपचार योग्यरितीने मिळावेत, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे 'ट्रान्सफर प्लॅन' तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आजाराचे निदान झालेली बालके कोणत्या एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात यावीत आणि गरज भासल्यास कोठे पाठवले जावे, याबाबत नियोजन करण्यात आले आहे.

  • कमला नेहरू रुग्णालयात 20 खाटा, राजीव गांधी रुग्णालय आणि सोनवणे प्रसूतिगृहात प्रत्येकी 15 एनआयसीयू खाटा.
  • बालकांवरील उपचारांच्या गरजेप्रमाणे बालकांना संबंधित विशिष्ट रुग्णालयात दाखल करणार
  • बालकांना एनआयसीयूमध्ये दाखल करण्याआधी रुग्णालयाशी संपर्क साधावा.
  • कमला नेहरू रुग्णालयात जागा नसल्यास त्यांनी 'अलॉट' केलेल्या एनआयसीयूशी संपर्क साधावा.

उपचारांची सद्य:स्थिती
(जानेवारी 2022 ते जानेवारी 2023)
उपचार घेतलेल्या बालकांची संख्या – 1426

कमी दिवसांची/कमी वजनाची बालके-826

ऑक्सिजन/व्हेंटिलेटर सपोर्टची गरज-384

डोळ्यांची तपासणी-50

कावीळ झाल्यावर फोटोथेरपी-1036

मृत्यू – 33
शस्त्रक्रिया – 0

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news