रेल्वेतून गांजा तस्करी नित्याचीच ! पाळेमुळे शोधून काढणे अतिशय गरजेचे

कुरकुंभ : रेल्वे गाड्यातून गांजाची तस्करी होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. एखादी गांजाची तस्करी उघड झाल्यावर याबाबत बोंबाबोंब होते. अन्यथा गांजा तस्करी नेहमीच होत असेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. सातत्याने होणारा हा गंभीर प्रकार रोखणार कसा, त्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, याची पाळेमुळे शोधून मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रेल्वेचा प्रवास हा सुखाचा प्रवास म्हणून पाहिले जाते. जेवण, झोपणे, वॉश रूम, फिरणे, बसणे, गप्पा मारणे, अशा सर्व सुविधा मिळतात. प्रवास म्हटलं की पिशव्या, बॅग, सुटकेस अशा वस्तू येतात. कोण कुठे काय ठेवते, बॅगेत काय असेल, याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे गांजा वाहतुकीस रेल्वे प्रवास सुरक्षित मानला जात असावा. सुपरफास्ट, एक्स्प्रेस रेल्वेतून गांजा तस्करीची वाहतूक केली जाते. त्याचबरोबर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ (ता. दौंड) हद्दीत गांजाची वाहतूक करताना चारचाकी वाहन पकडण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

त्यामुळे रेल्वेसह खासगी वाहतुकीने गांजाची तस्करी होत असल्याचे समोर आले होते. बहुतांश स्थानकात व स्थानकाबाहेर तपासणीच होत नाही. रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिस व स्थानिक ग्रामीण पोलिसांकडून फक्त संशयितांची किंवा खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर एखाद्याची तपासणी केली जाते. अन्यथा सर्व आलबेल म्हणून पाहिले जाते. अशा अनेक बाबींचा फायदा गांजा तस्करांना होत आहे. तस्करी करून आणलेल्या गांजाचे ग्रामीण भागात वाटप केले जाते. गांजाचा वास येऊ नये म्हणून त्या पद्धतीची बांधणी केली जाते. गेल्या काही दिवसांपासून रेल्वेतून गांजा तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बऱ्याचदा रेल्वेतून गांजा पकडण्यात आल्याच्या घटना उघडकीस येतात. गांजाची तस्करी करताना कुठलाही संशय येऊ नये म्हणून शक्यतो रिझर्व्हेशन करून प्रवासी म्हणून प्रवास करतात. जिथे गांजाच्या बॅग ठेवल्या आहेत. त्यापासून लांब बसून लक्ष दिले जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news