पुणे शहरात आठवडाभरात स्मार्ट सिग्नल

पुणे शहरात आठवडाभरात स्मार्ट सिग्नल

Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर स्मार्ट सिटीअंतर्गत 110 प्रमुख चौकांमध्ये बसविण्यात येणार्‍या अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील आठवड्यात ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

शहरात खासगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने रस्ते अपुरे पडत आहेत. परिणामी, वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलिस आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून संयुक्तपणे उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील प्रमुख 110 चौकांमध्ये अत्याधुनिक सिग्नल बसविले जाणार आहेत. हे सिग्नल पूर्णत: स्वयंचलित असणार असून, सिग्नलला थांबलेल्या वाहनांच्या संख्येची मोजणी करून ते स्वत:ची वेळ स्वत: निश्चित करणार आहेत. तसेच, सिग्नलवरून पुढे गेलेल्या वाहनांची माहिती संगणक यंत्रणेद्वारे देवाण-घेवाण करून एकमेकांच्या वेळा सिंक्रोनाईज करणार आहेत.

परिणामी, ज्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ अधिक असेल त्या रस्त्यावर सिग्नलचा वेळ जास्त असेल. तर, ज्या रस्त्यावरील वाहने सिग्नलच्या पुढे जातील आणि एकही वाहन नसेल तेव्हा सिग्नल इतर बाजूची वाहतूक आपोआप सुरू करेल. याशिवाय, ही स्वयंचलित यंत्रणा असल्याने सिंग्नलमध्ये काही बिघाड झाल्यास अथवा वाहतूक कोंडी झाल्यास कोणत्या ठिकाणी कोंडी झाली आहे, याची माहितीही मेसेजद्वारे स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सिस्टिम, महापालिका तसेच वाहतूक पोलिसांच्या यंत्रणेला मिळणार आहे.

या सिग्नलमध्ये कॅमेरे असणार असून, ते रस्त्यावरील वाहनांची मोजणी करून त्यानुसार आपल्या वेळा स्वत: बदलणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

या रस्त्यांवर यंत्रणा

  • कर्वे रस्ता ते गोळीबार मैदान
  • स्वारगेट ते कात्रज
  • स्वारगेट ते सिंहगड रस्ता
  • येरवडा ते नगर रस्ता
  • शिवाजीनगर ते बाणेर रस्ता

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news