पिंपरी : एसटीतून प्रवासासाठी स्मार्ट कार्डला पसंती

पिंपरी : एसटीतून प्रवासासाठी स्मार्ट कार्डला पसंती
Published on
Updated on

पिंपरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेचा लाभ प्रवाशांना घ्यायचा असेल तर स्मार्ट कार्डचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. या सेवेचा लाभ पिंपरी-चिंचवड शहरातील 12914 प्रवाशांनी घेतल्याची माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.
महामंडळाच्या वतीने प्रवाशांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी मार्च 2023 पर्यंत मुदत दिली. कार्डधारकांमध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, सैनिक, पत्रकार यांचा समावेश आहे. पुणे विभागात 95 टक्के नागरिकांना स्मार्ट कार्ड मिळाले असून, स्मार्ट कार्डधारकांचा आकडा लाखाच्यावर आहे.

सरकारने 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सोय केली आहे. 65 ते 75 वयोगटांतील ज्येष्ठांनाही 50 टक्के सवलत मिळते. त्यामुळे ज्येष्ठांना मिळालेल्या सवलतीला लाभ अनेक जेष्ठ नागरिक घेत असून, स्मार्ट कार्ड काढण्यात अग्रेसर आहेत. एसटी बसने प्रवास करताना ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार यांच्यासह 29 समाजघटकांना प्रवासी भाड्यात 33 ते 100 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. पुणे जिल्ह्यात 30 जून 2022 पर्यंत 81 हजार 562 स्मार्ट कार्डाचे वाटप एसटी प्रशासनातर्फे करण्यात आले होते.

आगार स्मार्ट कार्डधारक
पिंपरी चिंचवड 12,914
भोर 736
बारामती 10,335
बारामती एमआयडीसी 2884
दौंड 2954
इंदापूर 2963
नारायणगाव 2627
राजगुरुनगर 3344
शिवाजीनगर 9810
शिरूर 4164
सासवड 2632
स्वारगेट 16,891
तळेगाव 6308

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news