तळेगाव ढमढेरे : किरकोळ वादातून बहिणीला मारहाण

तळेगाव ढमढेरे : किरकोळ वादातून बहिणीला मारहाण

Published on

तळेगाव ढमढेरे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : धामारी येथे बोअरच्या पाण्याच्या वादातून वडिलांना केलेल्या दमदाटीचा जाब विचारल्याने भावाने बहिणीला बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शिक्रापूर पोलिस ठाण्यात अरुणा सुदाम शिर्के (वय 42, रा. वरचा मळा, धामारी, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. अरुणा शिर्के या तिच्या आई-वडिलांकडे राहतात.

भाऊ केतन याने बोअरच्या पाण्यावरून वडील सोमनाथ यांना दमदाटी केली असता अरुणा यांनी त्याचा जाब विचारला. तेव्हा केतन डफळ, अन्य भाऊ व नातेवाइकांनी मिळून अरुणा यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. मारहाणीत अरुणा शिर्के यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. शिक्रापूर पोलिसांनी किशोर सोमनाथ डफळ, केतन सोमनाथ डफळ, पांडुरंग सोमनाथ डफळ (तिघे रा. धामारी, ता. शिरूर), रोहिणी भोंडवे (रा. लोहगाव, ता. हवेली), लता सातकर (रा. सातकरस्थळ, ता. खेड) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश सुतार करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news