Pune Pothole Free City: पुणे खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेचे ‘मिशन’; १५ अभियंत्यांवर जबाबदारी, महिनाभरात टार्गेट पूर्ण करण्याचे आदेश

सोमवारपासून युद्धपातळीवर कामाला सुरुवात; मोठ्या रस्त्यांसाठी पथ विभाग, छोट्या रस्त्यांची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांवर
Road Potholes
Road PotholesPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नांवर महापालिका प्रशासनाला सातत्याने पुणेकरांच्या टीकेला सामोरे जावे लागत असल्याने महापालिकेने आता खड्डे बुजवण्याचे मिशन हाती घेतले आहे. त्यासाठी महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एका कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, येत्या महिनाभरात खड्डेमुक्त शहराचे टार्गेट निश्चित करण्यात आले आहे.

Road Potholes
Duty Free Sugar Import: साखरेचा साठा घटला; दरवाढ रोखण्यासाठी १० लाख टन कच्ची साखर ‘ड्युटी फ्री’ आयात

महापालिकेच्या मुख्यसभेत खड्ड्यांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत आठवडाभरात खड्डे बुजवले नाही तर रस्त्यावर उतारण्याचा इशारा स्थायी समिती अध्यक्षांनी दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सर्व विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची बैठक घेतली.

Road Potholes
Purandar Airport Daund Development: पुरंदर विमानतळ ठरणार दौंडच्या विकासाचे ‘टेकऑफ’; उद्योग, शेती आणि रोजगाराला नवी झेप

या बैठकीत शहरातील १२ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे पथ विभागामार्फत बुजवण्यासाठी मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १५ क्षेत्रीय कार्यालयासाठी प्रत्येकी एका कार्यकारी अभियंत्याची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना पथ विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाची कर्मचारी यांची टीम यामाध्यमातून खड्डे बुजवण्याचे काम करायचे आहे.

Road Potholes
Pondhe Stone Crusher Project: खडीमशिन प्रकल्पाला पोंढे ग्रामस्थांचा तीव्र विरोध; परवानगी रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

महापालिकेच्या अंदाजपत्रकात खड्डे दुरुस्तीसाठी असलेला निधी या कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून या कामांना प्रारंभ होणार असून, एका महिन्यात संपूर्ण शहर खड्डेमुक्त करण्याचे निर्देश आयुक्तांनी बैठकीत दिले. याशिवाय १२ मीटरपेक्षा कमी रुदींचे रस्ते बुजवण्याची जबाबदारी उपायुक्त आणि क्षेत्रिय कार्यालयांवर सोपवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news