Sinhgad Road theatre project
महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले सांस्कृतिक भवन आणि कलामंदिराचे प्रकल्पचित्रPudhari

Sinhgad Road theatre project: नाट्यगृहाबाबत पालिका अधिकाऱ्यांनी समजून घेतल्या कलाकारांच्या सूचना

महापालिका उभारतेय सांस्कृतिक भवन व कलामंदिर; नाट्यव्यवस्थापक आणि कलाकारांच्या सूचना घेत प्रकल्प अंतिम टप्प्यात
Published on

पुणे : कलाकारांना, नाट्य व्यवस्थापकांना, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना विश्वासात न घेता उपनगरात उभारलेली अनेक नाट्यगृहे कुचकामी असल्याचे सिद्ध होत गेले. त्यामुळे महापालिकेने सिंहगड रस्त्यावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहाला अंतिम रूप देण्याआधीच कलाकारांना, नाट्यव्यवस्थापकांना, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना थेट प्रकल्प ठिकाणी नेले, त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या अन्‌‍ मागील अनुभवापासून आपण शहाणे झाल्याचेच अधिकाऱ्यांनी दाखवून दिले.(Latest Pune News)

गेल्या काही वर्षांपासून पालिकेमार्फत सिंहगड रस्ता वडगाव बुद्रुक येथे 800 आसनव्यवस्था असलेले श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले सांस्कृतिक भवन व कलामंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. नाट्यगृह, सरावासाठी छोटे सभागृह, कलादालन, संगीत ॲकॅडमी असे नाट्यगृहाचे स्वरूप असणार आहे.

Sinhgad Road theatre project
Unauthorized construction demolition: कोंढव्यात अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा; 5,500 चौ.फु. आरसीसी पाडले

नव्याने बांधण्यात येणाऱ्या या नाट्यगृहाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू असले, तरी ते अजूनही अंतिम टप्प्यात आलेले नाही. त्यामुळेच नाट्यगृहाला अंतिम रूप देण्याआधी महापालिकेच्या सांस्कृतिक आणि भवन रचना विभागामार्फत सोमवारी (दि. 29) प्रकल्प पाहणीचे आयोजन केले होते. त्यात कलाकार, नाट्य व्यवस्थापक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजकांनी सहभागी होऊन काही सूचना नोंदविल्या. त्यांच्या सूचनानुसार पाऊले उचलण्याचे आश्वासनही अधिकाऱ्यांनी या वेळी दिले.

Sinhgad Road theatre project
Cooperative societies annual meeting: सहकारी संस्थांना वार्षिक सभा घेण्यासाठी मुदतवाढ, 31 ऑक्‍टोबरपर्यंत वेळ

या प्रकल्प पाहणीत संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, मराठी चित्रपट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, नाट्यव्यवस्थापक मोहन कुलकर्णी, समीर हंपी, सत्यजित धांडेकर, प्रवीण बर्वे आदी सहभागी झाले आणि त्यांनी आपल्या सूचना सांगितल्या. भवन रचना विभागातील अधिकाऱ्यांसह पालिकेच्या नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे या वेळी उपस्थित होते.

Sinhgad Road theatre project
Pune road contractor scam: रस्त्याच्या कामांसाठी दोन अपात्र ठेकेदारांना केले पात्र; ‘आपला पुणे परिसर‌’ संस्थेचा आरोप

कलाकारांनी, नाट्यव्यवस्थापकांना केलेल्या सूचना

एकच डायनिंग हॉल तळमजल्यावर असावा.

पहिल्या मजल्यावरील कलादालनामध्ये रंगमंचाची व्यवस्था करावी.

छोट्या कार्यक्रमासाठी एक हॉल असावा.

उपलब्ध जागेत रंगीत तालीमसाठीचे दोन हॉल असावेत.

Sinhgad Road theatre project
Ayush Komkar Case Update: आंदेकर टोळीची येरवडा कारागृहात रवानगी

गेल्या अनेक वर्षांपासून या नाट्यगृहाचे काम रखडलेले आहे. येथे चार मजली बांधकाम करण्यात येणार असल्याने कलाकारांना आणि रंगकर्मींना सोयीचे होतील, असे काही बदल करण्यात यावे, याविषयी सूचना केल्या आहेत. सिंहगड रस्त्यावर नाट्यगृहाची आवश्यकता होती. सोयी-सुविधांनी परिपूर्ण असलेले नाट्यगृह उभारले जावे, असेच आम्हाला वाटते.

सुनील महाजन, अध्यक्ष, संवाद पुणे

नाट्यगृहाचे काम पूर्ण होण्यापूर्वी कलाकार, नाट्य व्यवस्थापक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजकांच्या सूचना जाणून घेणे महत्त्वाचे होते. त्यामुळेच नाट्यगृहाच्या उभारण्याआधी कलाकार, नाट्यव्यवस्थापकांच्या सूचना जाणून घेण्यात आल्या. त्या सूचनांवर विचार करून योग्य बदल नक्कीच केले जातील.

राजेश कामठे, मुख्य व्यवस्थापक, नाट्यगृह विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news