Ekta Nagar News: एकतानगरी पुनर्वसन प्रस्ताव कागदावरच; दोन वर्षे उलटली तरी कार्यवाही नाही

नदीकाठ सुधारणा व क्लस्ट‍र योजना दोन्ही प्रस्ताव प्रलंबित
Ekta Nagar News
Ekta Nagar NewsPudhari
Published on
Updated on

पुणे: सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगर, विठ्ठलनगर या सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचा प्रकार बुधवारी घडला. या घटनेनंतर सोसायटीचे स्थलांतर करून येथे पुनर्वसन योजना राबवण्यासह पुराचे पाणी शिरू नये यासाठीच्या उपाययोजना दोन वर्षांनंतरही कागदावरच असल्याचे वास्तव समोर आले आहे. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

दोन वर्षांपूर्वी जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे मुठा नदीला आलेल्या पुरामुळे सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगरी, विठ्ठलनगर, निंबजनगर भागात पूरस्थिती निर्माण झाली होती.

Ekta Nagar News
Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन गैरव्यवहारातील दस्त अखेर रद्द; पुण्यातील दिवाणी न्यायालयाचा आदेश

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट या ठिकाणी भेट देऊन पूरपरिस्थिती कायमस्वरूपी रोखण्यासाठी उपाय करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पुणे महापालिकेने मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अंतर्गत वडगाव खुर्द ते राजाराम पूल हा ४.१० किमी लांबीचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला.

या प्रकल्पांतर्गत नदीकिनारी सीमाभिंत बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ३०० कोटी रुपये खर्च येणार असून, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत या निधीची मागणी करण्यात आली आहे. तर, दुसरा पर्याय म्हणून या सर्व सोसायट्यांचा एकत्रितरीत्या क्लस्टर योजना राबवून त्यांचे पुनर्वसन करण्याची योजना महापालिकेने आखली आहे.

Ekta Nagar News
Agriculture Admission 2026: कृषी विद्यापीठांतील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया आजपासून

त्यासंबंधीचा प्रस्तावही महापालिकेने राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत या दोन्ही प्रस्तावांवर राज्य शासनाने काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे एकतानगरी, विठ्ठलनगर, निंबजनगर या सोसायट्यांमधील रहिवाशांना पाऊस सुरू झाला की जीव मुठीत धरूनच राहावे लागत आहे. बुधवारी येथील रहिवाशांनी पुन्हा हा अनुभव घेतला.

एकतानगर, विठ्ठलनगर या सोसायट्यांमध्ये नदीच्या पुराचे पाणी शिरू नये, यासाठी नदीकाठ सुधारणा प्रकल्पातंर्गत सीमाभिंत बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी राज्य सरकाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच, या ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्याचा प्रस्तावही राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

- अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news