पुणे : सिंहगड पर्यटकांच्या गर्दीने ’हाऊसफुल्ल’

पुणे : सिंहगड पर्यटकांच्या गर्दीने ’हाऊसफुल्ल’
Published on
Updated on

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  सिंहगडासह खडकवासला धरण, चौपाटी, पानशेत धरण परिसर रविवारी पर्यटकांनी गजबजून गेला होता. पुणे-पानशेत रस्त्यावरील खडकवासला धरण माथ्यापासून डीआयटी, किरकटवाडी फाटा, नांदेड फाट्यापर्यंत रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

खडकवासला धरण चौकात रात्री साडेआठच्या सुमारास वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांचे हाल झाले. सिंहगड किल्ल्यावर दिवसभरात पर्यटकांची चारचाकी 464 व दुचाकी 975 वाहने आल्याची नोंद झाली. सकाळी दहापासून गडाच्या घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही काळ वाहतूक बंद करण्यात आली. सिंहगड वन विभागाचे वनरक्षक बाळासाहेब जिवडे व सुरक्षारक्षकांना मोठी कसरत करावी लागली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news