Sinhagad Tourist Assault: सिंहगडावर पर्यटकांवर दहशत; महिला, मुलांसह ज्येष्ठांना मारहाण, ९ जणांवर गुन्हा

हाफपँट घातल्याच्या कारणावरून दीड-दोन तास धुमाकूळ; श्री दुर्गसंवर्धन संस्थेच्या सदस्यांवर हवेली पोलिसांची कारवाई
Sinhagad Fort Fight Video Viral
Sinhagad Fort Fight Video ViralPudhari
Published on
Updated on

वेल्हे: सिंहगड किल्ल्यावर रविवारी (दि. १६) दुपारी कायदा हातात घेऊन हाफपँट घालणाऱ्या लहान मुलांसह महिला तसेच ज्येष्ठ पर्यटकांना मारहाण करून धुमाकूळ घालत दहशत निर्माण करणाऱ्या ९ जणांवर हवेली पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

Sinhagad Fort Fight Video Viral
Pune civic issues: पुण्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; कुठे ड्रेनेजमिश्रित सांडपाणी, तर कुठे कचऱ्याचे ढीग

संकेत संजय पाटील, अविनाश दिलीप आपार, रेवण नारायण कोकाटे, सायली सुजित चव्हाण, केतकी सुरज जाधव, अमर रामचंद्र शिर्के, कुणाल किसन नलावडे आणि आर्या प्रवीण कवडे, अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण श्री दुर्गसंवर्धन संस्थेचे सदस्य असल्याची माहिती हवेली पोलिसांनी दिली. याप्रकरणी अवधूत पांडुरंग पाटील (रा. डीएसके विश्व संकुल, धायरी) यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Sinhagad Fort Fight Video Viral
NCDC Amendment Bill 2026: सहकार क्षेत्राला बळकटी देणारे एनसीडीसी दुरुस्ती विधेयक; अनास्करांकडून स्वागत

हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश रामघरे यांनी घटनेचे गांभीर्य पाहून वेगाने हालचाली करीत पर्यटकांना मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Sinhagad Fort Fight Video Viral
DMER Librarian Recruitment: डीएमईआरच्या ग्रंथपाल भरतीवरून वाद; पदवी-पदव्युत्तरधारक उमेदवारांना अपात्र ठरवल्याचा आरोप

पोलिस निरीक्षक राजेश रामघरे म्हणाले की, आरोपींविरोधात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. रविवार असल्याने गडावर देशभरातील पर्यटकांनी गर्दी केली होती. नरवीर तानाजी मालुसरे समाधीचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांच्या रांगा लागल्या होत्या. तेथे असलेल्या या संस्थेच्या तरुण-तरुणी हे अचानक हाफपँट घालणाऱ्या लहान मुलांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर तुटून पडले.

Sinhagad Fort Fight Video Viral
Chakan Traffic Congestion: चाकणच्या वाहतूक कोंडीला ‘मिसिंग लिंक’ची प्रतीक्षा; पीएमआरडीएच्या २६१ कोटींच्या घोषणांवर नागरिकांचा सवाल

समाधिस्थळासह परिसरात हाफपँट घालणारा दिसेल त्या पर्यटक, लहान मुलांना थोबाडीत मारून त्यांना दमदाटी करीत होते. त्यामुळे पर्यटकांत प्रचंड दहशत निर्माण झाली. गयावया करून देखील या हल्लेखोरांनी महिला, मुलांना सोडले नाही. दुपारी दीड ते दोन तास या टोळक्याचा धुमाकूळ सुरू होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news