Sinhagad Landslide Alert: सिंहगड घाटरस्त्यावर दरडींचा धोका; पुणे दरवाजाकडे जाणार्‍या पाऊलवाटेचा भराव खचला

गडाच्या वाहनतळाकडून पुणे दरवाजाकडे जाणार्‍या पाऊलवाटेचा भराव, संरक्षण भिंत खचल्याने पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
Sinhagad Landslide Alert
सिंहगड घाटरस्त्यावर दरडींचा धोकाPudhari
Published on
Updated on

Sinhagad Fort Landslide Risk During Monsoon

वेल्हे: शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांनी फुल्ल होणार्‍या सिंहगड किल्ल्याच्या घाटरस्त्यावर दरडींचा धोका कायम असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. गडाच्या वाहनतळाकडून पुणे दरवाजाकडे जाणार्‍या पाऊलवाटेचा भराव, संरक्षण भिंत खचल्याने पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून गड व परिसरात पाऊस सुरू आहे. त्यामुळे गडावरील पाऊलवाटा, अतकरवाडी पायी मार्गासह इतर मार्ग निसरडे झाले आहेत. पाणी वाहत असल्याने पायर्‍या, खडकावर शेवाळे साठली आहेत. (Latest Pune News)

Sinhagad Landslide Alert
Monsoon Tourism Safety: राजगड, तोरणागडासह पर्यटनस्थळांवर मनाई नाही; धोकादायक ठिकाणी बंदी, प्रशासनाची माहिती

त्यामुळे पर्यटकांना ये-जा करताना जपून चालावे लागणार आहे. दरम्यान सिंहगड वन विभागाने सध्या पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सततच्या पावसामुळे दरडींचा धोका असलेल्या अनेक ठिकाणी तसेच गडावरी निसरड्या पायर्‍या, बुरुज, कडे अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षेसाठी पुरेसे सुचना फलक लावण्यात आले नाहीत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ठिकाणी सूचना फलक उभारण्यात यावेत तसेच खबरदारीच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी स्थानिक माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांनी केली आहे.

Sinhagad Landslide Alert
Shri Chhatrapati Sugar Factory: ‘श्री छत्रपती’च्या ड्रॉ धोरणामुळे सभासदांमध्ये समाधान

गडाच्या घाटरस्त्यावरील बहुतेक धोकादायक दरडी लोखंडी जाळ्या बसवून संरक्षित करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तोडलेल्या डोंगराच्या दरडी कोसळण्याचा धोका आहे. पावसामुळे रस्त्यावर दगड, गोटे, माती कोसळत आहे. ती तातडीने हटविण्यात येत आहे. वाहनतळाकडून पुणे दरवाजाकडे जाणार्‍या पायी मार्गावर संरक्षक कठडे काही कोसळले आहेत तसेच भराव उन्मळून पडला आहे. या मार्गाचा सिंहगड विकास आराखड्यात समावेश करण्यात आला असून त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

- समाधान पाटील, वन परिमंडल अधिकारी, सिंहगड वन विभाग

वाहनतळाकडुन पुणे दरवाजाकडे जाणार्‍या पायी मार्गाचे संरक्षक कठडे दरवर्षी पावसाळ्यात उन्मळून कोसळत आहेत. भरावही खचले आहेत. जोरदार पावसात पायी मार्गाचे संरक्षक कठडे जमीनदोस्त होऊन मार्ग बंद होण्याचा धोका आहे तसेच अनेक ठिकाणी दरडी उन्मळून आल्या आहेत, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

- पांडुरंग सुपेकर, अध्यक्ष, घेरा सिंहगड वनसंरक्षण समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news