Gold Silver Price Drop: धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीच्या दरात तब्बल १३ हजारांची घसरण

सोनेही स्वस्त; पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३० हजारांवर, तर चांदीचा भाव १ लाख ७२ हजारांवर आला
Gold Silver Price Drop
Gold Silver Price DropPudhari
Published on
Updated on

नवी दिल्ली : धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घट झाली. सोने दहा ग्रॅममागे १,९१० रुपयांनी आणि चांदीच्या भावात एका किलो मागे तब्बल १३ हजार रुपयांनी घट झाली आहे.  (Latest Pune News)

Gold Silver Price Drop
Drug Smuggler Death: पोलिसांशी झटापटीदरम्यान बेशुद्ध पडला; अटक करण्याच्या प्रयत्नात अमली पदार्थ तस्कराचा मृत्यू

सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव १,९१० रुपयांनी घटून १ लाख ३० हजार ८६० रुपयांवर आला आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा भाव १,७५० रुपयांनी घटून १ लाख १९ हजार ९५० रुपयांवर आला आहे. चांदीचा भाव १ लाख ८५ वरून १ लाख ७२ हजार रुपयांवर घसरला आहे. चांगल्या दराचा फायदा घेण्यासाठी सटोडियांनी विक्री केल्याने दरात काहीशी घसरण पाहायला मिळत आहे.

Gold Silver Price Drop
Gang Member Arrested: ‘मकोका’ कारवाईनंतर पसार आरोपीला अखेर अटक; बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड

असे आहेत शहरातील दर....

धनत्रयोदशीनिमित्त सोने आणि चांदीची नाणी, लक्ष्मी आणि गणेशाची प्रतिमा, वेढणी यांना चांगली मागणी आहे. वस्तू आणि सेवा करासह (जीएसटी) २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १ लाख ३२ हजार रुपये असून, २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २२ हजार ५७० रुपये आहे. चांदीचा प्रतिकिलो भाव १ लाख ७८ हजार रुपये असल्याची माहिती पुण्यातील सराफा व्यावसायिक वस्तूपाल रांका यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news