Gang Member Arrested: ‘मकोका’ कारवाईनंतर पसार आरोपीला अखेर अटक; बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड

माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीवर कारवाई; भारती विद्यापीठ पोलिसांचे यश
बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड
बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआडPudhari
Published on
Updated on

पुणे: माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील सराइतांच्या नातेवाईकांच्या घरावर पाळत ठेवणाऱ्या आंदेकर टोळीतील एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. दत्ता बाळू काळे (वय २४, रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आंदेकर टोळीतील सराइताविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर तो पसार झाला होता. (Latest Pune News)

बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड
Car Hits Dumper: भुकूम येथे डंपरला धडकून कारला आग; चालक किरकोळ जखमी

१ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा खुनाचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील सोमनाथ गायकवाड आणि साथीदारांच्या घराच्या परिसरात आंदेकर टोळीतील दत्ता काळेने पाळत ठेवली होती. प्रतिस्पर्धी टोळीतील सराइत आणि त्यांच्या नातेवाईकांच्या खुनाचा कट आंदेकर टोळीने रचला होता. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आंदेकर टोळीतील सराइतांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणात कृष्णा आदेंकर याच्यासह गुन्हा दाखल झाल्यानंतर काळे पसार झाला होता. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते.

बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड
Diwali Firecrackers Eye Injuries: पुण्यातील प्रकरणातून गंभीर इजा उघडकीस; दिवाळीत फटाके फोडताना डोळ्यांची काळजी घ्या

काळे लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाच्या परिसरातील उड्डाणपुलाजवळ थांबला होता. याबाबतची माहिती पोलिस कर्मचारी महेश बारावकर, मंगेश पवार यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून काळेला पकडले. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहल खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, महेश बारावकर, मंगेश पवार, नीलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांनी ही कारवाई केली

बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड
Yerawada Land Transfer: मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती; येरवड्यातील 48 हजार चौ.मी. सरकारी जमीन पीएमआरडीएकडे

दरम्यान, वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती. आयुष हा बंडू आंदेकरचा नातू आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात गणेश कोमकरला अटक करण्यात आली होती. आयुष याच्यावर अमन पठाण आणि यश पाटील यांनी गोळीबार केला होता. आयुष कोमकर खून प्रकरणात या प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०) याच्यास साथीदारांना अटक करण्यात आली. आंदेकरसह साथीदारांविरुद्ध 'मकोका' करवाई करण्यात आली होती. आंदेकर टोळीविरुद्ध खंडणी, बेकायदा फलक लावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जमीन व्यवहारात फसवणूक केल्या प्रकरणी बंडू आंदेकरसह बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध उत्तमनगर पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news