पुणे : ‘जायका’च्या कामाचा श्रीगणेशा लवकरच; कंपनीच्या पथकाने केली पाहणी

पुणे : ‘जायका’च्या कामाचा श्रीगणेशा लवकरच; कंपनीच्या पथकाने केली पाहणी
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मुळा-मुठा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने नियोजन केलेल्या जायका प्रकल्पाच्या मुख्य कामाला 10 ऑक्टोबरनंतर सुरुवात केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. दरम्यान, जायका कंपनीच्या पथकाने नुकताच पुणे दौरा करून प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणार्‍या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या (एसटीपी) जागांना भेट देऊन पाहणी केल्याचेही कुमार यांनी सांगितले.

जायका कंपनीच्या सहकार्याने मुळा-मुठा नदीसंवर्धन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत शहरात निर्माण होणारे सांडपाणी 100 टक्के शुद्ध करून मुठा नदीत सोडले जाणार आहे. सुमारे 1500 कोटींचा हा प्रकल्प असून, त्यात जायकाकडून 990 कोटींचे कर्ज जायकाकडून केंद्राच्या माध्यमातून दिले जाणार आहे. 2016 मध्ये मंजूर झालेल्या या प्रकल्पाचे अखेर ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

पहिल्या टप्प्यात 11 एसटीपी प्रकल्प बांधण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या आवश्यक असलेल्या जागाही महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आहेत. दरम्यान, 10 ऑक्टोबरपूर्वी मातीपरीक्षण, सर्व प्रकारचे सर्व्हे, प्रकल्प आराखडा आदी कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी जायका कंपनीच्या प्रतिनिधी आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांनी नुकतीच या प्रकल्पासाठी लागणार्‍या जागांची पाहणी केली आहे.

पालिकेकडून जायकाला विनंती
महापालिकेच्या सहा एसटीपी प्रकल्पांची पाणी शुद्धीकरणक्षमता कालबाह्य झाली आहे. त्यामुळे प्रकल्पांचा अभ्यास करून एसटीपी व मलवाहिन्या टाकण्याचे काम करण्याची विनंती जायकाकडे करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news