

भवानीनगर: इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. १८) रोजी मतदान पार पडले होते सोमवारी (दि. १९) सकाळी ९ वाजल्यापासून याची मतमोजणी सुरू झाली. ती अखेर मंगळवारी (दि. २०) पहाटेपर्यंत चालली.
यात पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि साखर संघाचे माजी अध्यक्ष श्री जय भवानी माता पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील श्री जय भवानी माता पॅनलने दणदणीत विजय मिळवला. तब्बल २२ वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर श्री छत्रपती कारखान्यावर जाचक पर्वाला सुरुवात झाली आहे. (Latest Pune News)
श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत श्री जय भवानी माता फॅमिली २१ पैकी २१ जागा मोठ्या फरकाच्या मताधिक्याने मिळवून मिळवून विरोधी श्री छत्रपती बचाव पॅनलचा धुवा उडवला आहे. या निवडणूकीत इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यातील राजकारणातील दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोलप कुटुंबाला मोठा फटका बसला आहे.
इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गट क्रमांक एक लासुर्णेमधून श्री जय भवानी माता पॅनेलचे पृथ्वीराज जाचक यांना ११६९४ मते मिळाली आहेत. शरद जामदार यांना १०५२९ मते मिळाली आहेत.
श्री छत्रपती बचाव पॅनलचे संजय निंबाळकर यांना ४८५०, प्रताप पवार यांना ४१९७ मते मिळाली आहेत. गट क्रमांक दोन सणसरमध्ये श्री जय भवानी माता पॅनेलचे रामचंद्र निंबाळकर यांना १०९२९ मते मिळाली, तर शिवाजी निंबाळकर यांना १०४३१ मते मिळाली.विरोधी संग्राम निंबाळकर यांना ५१६५ मते मिळाली. महादेव शिरसाट यांना ३९५७ मते मिळाली.
गट क्रमांक तीन उद्धट गटामधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार पृथ्वीराज श्रीनिवास घोलप यांना ९६७२ मते मिळाली, गणपत सोपान कदम यांना ९२९७ मते मिळाली. तर या गटात मात्र घोलप यांना मोठा फटका बसला आहे. इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप हे श्री छत्रपती बचाव पॅनलमधून मैदानात होते त्यांना ६९६१ मते मिळाली आहेत.
भाजपचे नेते तानाजीराव थोरात यांना ४७२१ मते मिळाली आहेत. गट क्रमांक चार अंथुर्णे गटामधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार प्रशांत दासा दराडे यांना १११८० मते मिळाली तर अजित नरुटे यांना ११०९० मते मिळाली. विरोधी पॅनलचे श्री छत्रपती बचावमधून मैदानात असलेले बाबासाहेब झगडे यांना ४९४० मते तर राजेंद्र पाटील यांना ४८६० मते मिळाली.
गट क्रमांक पाच सोनगावमधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार अनिल सिताराम काटे यांना ११७८९ मते तर बाळासाहेब कोळेकर यांना ११७६८ मते मिळाले आहेत. संतोष मासाळ यांना १०३०७ मते मिळाली. याच गटात विरोधी असलेले श्री छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार रवींद्र टकले यांना ५४८२ मते मिळाली.
गट क्रमांक सहा गुणवडी गटामध्ये श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार कैलास गावडे यांना ११८३२ मते, तर निलेश टिळेकर यांना ११५६३ मते आणि सतीश देवकाते यांना ११२६१ मते मिळाले आहेत. विरोधी असणारे नितीन काटे यांना ५४३४ मते मिळाली आहेत. इतर मागास प्रवर्गमधून उभे असलेले श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार तानाजी शिंदे यांना ११३५८ मते मिळाली तर विरोधी असलेले संदीप बनकर यांना ५१६६ मते मिळाली.
भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार योगेश पाटील यांना ११८४३ मते, तर योगेश पाटील यांना पाठिंबा दिलेले उमेदवार तुकाराम काळे यांना ४१७२ मते मिळाली. अनुसूचित जाती जमाती मधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार मंथन कांबळे यांना ११५११ मते मिळाली तर विरोधी असणारे बाळासाहेब कांबळे यांना ४९६१ मते मिळाली. जय भवानी माता पॅनलचे ब वर्गाचे उमेदवार अशोक संभाजी पाटील यांना २६० मते मिळाली तर त्यांना पाठिंबा दिलेले सत्यजित सपकळ यांना १८ मते मिळाली.