पिंपरी : फ्रेंडशिप बँडने सजली दुकाने

पिंपरी : फ्रेंडशिप बँडने सजली दुकाने
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  मैत्री कधी, कोणाशी, कोठे व कशी होईल, हे सांगता येत नाही. मात्र, मैत्री व्यक्त करण्यासाठीही एक दिवस आहे; तो म्हणजे 'फ्रेंडशिप डे'. शाळा व महाविद्यालय सुरू झाल्यानंतर नवीन मित्र-मैत्रिणी जोडल्यानंतर मैत्री व्यक्त करण्यासाठी तरुणाईला 'फ्रेंडशिप डे'चे वेध लागतात. मैत्रीच्या धाग्यात गुंफण्यासाठी दुकानांमध्ये विविध प्रकारचे 'फ्रेंडशिप बँड' दाखल झाले आहेत.
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. येत्या रविवारी (दि.6) हा दिवस साजरा होणार आहे. साधारण ऑगस्टमध्ये महाविद्यालये सुरू होतात. त्याच वेळी हा दिवस साजरा होतो. त्यामुळे जुन्या मैत्रीला पुन्हा उजाळा व नवीन मैत्रीचे स्वागत या दिवशी केले जाते.

शहरात 'फ्रेंडशिप डे'च्या सेलिब्रेशनची तयारी जोरदार सुरू असून, शहरातील गिफ्ट शॉपीमध्ये आतापासूनच गर्दी दिसू लागली आहे. महाविद्यालयांसह शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनीही हा दिवस एक दिवस अगोदर अथवा दुसर्‍या दिवशी एकमेकांच्या हातात 'फ्रेंडशिप बँड' बांधून साजरा करतात. बच्चेकंपनीमध्ये देखील हा फ्रेंडशिप डे जोरात साजरा केला जातो. दुकानात बच्चेकंपनीची फ्रेंडशिप बँड खरेदी करण्याचा उत्साह दिसत आहे.

बँड्सचे प्रकार
फ्रेंडशिप बँडमध्ये काही मण्यांमध्ये 'फ्रेंड' असे अक्षर लिहिलेले बँड, रबरी बँड, दोर्‍यात गुंफलेले फॉरेवर फ्रेंडचे बँड, लहानांना आकर्षित करणारे विविधरंगी तसेच लाइट लागणारे व बांगडीसारखे बँडही बाजारात आले आहेत. रबरी आणि लेदरसारखे बँडही उपलब्ध आहेत. मित्र-मैत्रिणींसाठी रिबिन बँड हा सर्वात जास्त लोकप्रिय आहे. तसेच फ्रेंड अक्षर असलेली अंगठीलादेखील मागणी आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news