धक्कादायक ! सासरच्यांनी तरुणाला पाजले विष; उपचारांदरम्यान मृत्यू

धक्कादायक ! सासरच्यांनी तरुणाला पाजले विष; उपचारांदरम्यान मृत्यू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एका 19 वर्षीय तरुणाला त्याच्या पत्नीसह सासरच्या व्यक्तींनी जबरदस्तीने विष प्राशन करायला लावले. तरुणाची परिस्थिती गंभीर झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी, चतु:श्रृंगी पोलिसांनी पत्नीसह सासरच्या चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. असिब मंडल (19, मु. रा.पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत वडील लुत्फर रहमान मंडल सोलेमान मंडल (पश्चिम बंगाल) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीची 18 वर्षीय पत्नी राही बीबी, साडु बच्चु मिया (27), मेव्हणा मोनीरूल मिया (25), जुहरी बीबी आणि सासरा साबिरुल मिया (सर्व मुळ रा. बक्सा, पो.बिरोही, हरिघाटा, जि. नादिया) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असिब मंडल हा शहरातील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होता. त्याचा मेव्हाणा मोनीरुल मिया व साडु बच्चु मिया यांनी फोन असिब याच्या वडिलांना सांगितले की, असिब याने विष प्राशन केले असून त्याची परिस्थिती गंभीर आहे. त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे, तरी तुम्ही एक लाख रुपये घेऊन या असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी हे ससून रुग्णालयात त्यांच्या मुलाला बघण्यासाठी आले असता, तेथील डॉक्टरांनी उपचार सुरु असताना मुलास मृत घोषित केले.

त्यामुळे आरोपींनी यांनी तक्रारदार मंडल यांच्या मुलाला कट करुन जबरदस्तीने विष प्राशन करायला लावल्याने त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 ऑक्टोबर 2023 रोजी मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास बालेवाडी परिसरात घडला. दरम्यान याबाबत सुरूवातीला लुत्फर मंडल यांनी अशोकनगर पोलिस स्टेशन, जि.बारसत उत्तर 24 परगाना,पश्चिम बंगाल येथे तक्रार दिली होती. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक केंद्रे करत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news