धक्कादायक ! उसाच्या फडात सापडला वृद्धाचा सांगाडा

धक्कादायक ! उसाच्या फडात सापडला वृद्धाचा सांगाडा

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील उसाची तोडणी सुरू असताना एका उसाच्या शेतामध्ये 75 वर्ष वय असलेल्या पुरुषाचा हाडाचा सांगाडा आढळून आला आहे हा सांगाडा बाबामीया सय्यद मोमीन यांचा असावा असा प्राथमिक अंदाज पिंपळगावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे व त्यांचा मुलगा हरून यांनी या वृत्ताला दुसरा दिला आहे. तथापि बिबट्याच्या हल्ल्यातून ही घटना घडली असावी असेही नातेवाईकांचे म्हणणे आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील बाबा मी या सय्यद मोमीन वय वर्ष 75 हे गेले सहा महिन्यापासून गायब होते.मंगळवारी पहाटे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोडणी मजूर बाबामीया मोमीन यांच्या आमराई येथील उसाची तोडणी करत असताना हाडांचा सांगाडा आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ ऊस मालकाला दिली. बाबामिया मोमीन यांचा मुलगा हारून मोमीन तातडीने उसाच्या शेतामध्ये आल्यावर त्यांनी पाहणी केली असता या हाडाच्या सांगाड्यावर असलेले कपडे प्रथमदर्शनी माझे वडील बाबामीया सय्यद मोमीन यांचा असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.

बाबा मिया सय्यद मोमीन हे गेले सहा महिन्यापासून गायब होते. त्यावेळी नातेवाईकांनी खूप शोध घेतला परंतु ते कुठेही आढळून आले नव्हते. या घटनेची माहिती नारायणगाव पोलिसांना दिली असून नारायणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच वनविभागाला देखील कळविण्यात आलेला आहे हा हाडांचा सांगाडा नेमका कोणाचा? की बाबामिया सय्यद मोमीन यांचा? किंवा कसे?हे तपासांती निष्पन्न होऊ शकेल. नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ त्यांनी आपले टीम घटनास्थळी पाठवलेली आहे. वनविभागाची कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान घटनास्थळी स्थानिक नागरिकांची गर्दी झाली आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे ॲग्री सुपरवायझर वसंत मोरे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी देखील याबाबतचा पंचनामा करून अहवाल कारखान्याचे मुख्य शेतकरी यांना पाठवला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news