धक्कादायक! फुकट तंबाखू खाणाऱ्या मित्राला दगड घालून कायमचा संपवलं

धक्कादायक! फुकट तंबाखू खाणाऱ्या मित्राला दगड घालून कायमचा संपवलं

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : तंबाखू दिली नाही म्हणून शिवीगाळ केल्याने, तसेच रोजच फुकट तंबाखू खात असल्याच्या रागातून डोक्यात दगड घालून मित्राचा खून केला. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, जुन्नर न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. महेश विजय क्षीरसागर (वय 27) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राजेश देवराम काळे (दोघेही रा. वारुळवाडी, ता. जुन्नर) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश व राजेश हे दोघे चांगले मित्र आहेत. शुक्रवारी (दि. 15) मध्यरात्री महेशने राजेशला तंबाखू मागितली.

या वेळी राजेशने तंबाखू न दिल्याने महेशने त्याला शिवीगाळ गेली. तसेच, महेश हा रोज तंबाखू फुकट खातो याचा राग राजेशच्या मनात होता. मात्र, या वेळी शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या राजेशने महेशच्या डोक्यात दगड घातला. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्राव होत महेश बेशुद्ध पडला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेले सागर पवार, लखन परदेशी, गणेश कांबळे यांनी रुग्णवाहिका बोलावून महेशला नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, रविवारी (दि. 17) उपचार सुरू असताना महेशचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फौजदार जयदेव पाटील पुढील तपास
करत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news