

Tanaji Sawant :
पुणे : शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी आरोग्यमंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळी त्यांना चक्कर आणि उलट्या सुरू झाल्याने पुण्यातील ससून रोडवरील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केल्यानंतर तेथील वैद्यकीय पथकाने आमदार सावंत यांची तातडीने तपासणी केली. डॉ. पुर्वेज के. ग्रँट यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.