देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : देहू उपनगराध्यक्ष रसिका काळोखे व स्वीकृत नगरसेवक आनंदा काळोखे व रोहित काळोखे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय असवले यांची पिठासीन अधिकारी म्हणून नोंद केली होती.
त्यानुसार आज सकाळी ११ वाजता प्रक्रिया सुरू झाली. एक वाजता निकाल हाती आले तेव्हा शितल हगवणे यांची बिनविरोध उपनगराध्यक्ष अशी निवड झाली. तर स्वीकृत नगरसेवक म्हणून अक्षदा प्रकाश हगवणे व शिवसेनेचे गणेश उत्तम मोरे यांची निवड झाली. यावेळी झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवक उपस्थित होते. पिठासीन अधिकारी संजय असवले यांनी भेटवस्तू देऊन ही घोषणा केली. देहू नगरपरिषदेचे डॉ. प्रशांत जाधव उपस्थित होते.