Shirur Mephedrone Drug Case: शिरूरमध्ये २२ लाखांचे मेफेड्रॉन जप्त; दोघांना रंगेहाथ अटक

मलठणमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शिरूर पोलिसांची कारवाई; १०८.५ ग्रॅम अमली पदार्थासह मोटारसायकल जप्त
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

शिरूर: शिरूर तालुक्यातील मलठण गावच्या हद्दीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शिरूर पोलिसांनी संयुक्तपणे अमली पदार्थविरोधी मोहीम राबवत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. राजावाडा चौक परिसरात सोमवारी (दि. १७) मध्यरात्री केलेल्या या धडक कारवाईत २२ लाख रुपयांच्या मेफेड्रॉनसह दोन परप्रांतीय तरुणांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

Arrested
Khadakwasla Dam Water Release: खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांतून विसर्ग सुरू; ४० दिवसांत २२ टीएमसी पाणी सोडले

सुरेंद्रसिंह भैलूसिंह राठोड ऊर्फ राजपूत (वय २४) आणि श्रवण तेजाराम बिश्नोई (वय ३१, दोघे सध्या रा. मनीष शिरोळे फार्म हाऊस, मलठण, मूळ रा. बांकियावास खुर्द, जि. बाडमेर, राजस्थान) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस हवालदार तुषार पंधारे यांनी फिर्याद दिली आहे.

Arrested
Narhe Dhayari Traffic Jam: नऱ्हे-धायरीत वाहतूक कोंडीचा कहर; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

पोलीस हवालदार तुषार पंधारे व त्यांच्या पथकाला मलठण हद्दीत काही जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. त्यामुळे पोलिस पथकाने या माहितीच्या आधारे मलठणच्या राजवाडा चौकात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचला. यावेळी संशयित हालचाली करणाऱ्या सुरेंद्रसिंह राठोड ऊर्फ राजपूत आणि श्रवण तेजाराम बिश्नोई या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.

Arrested
Rahu Electric Shock Death: वीजेचा धक्का बसून दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू; राहू परिसरात शोककळा

त्यांची कसून झडती घेतली असता त्यांच्याकडे एक ५१ ग्रॅम वजनाचा लालसर काळपट रंगाचा क्रिस्टल स्वरूपातील, तर दुसरा ५७.५ ग्रॅम वजनाचा पांढऱ्या-पिवळसर रंगाचा मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ आढळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारात या पदार्थाची किंमत प्रतिग्रॅम २० हजार रुपये असे दोन्ही मिळून १०८.५ ग्रॅम मॅफेड्रॉन एकूण २१ लाख ७० हजार रुपयांचे , एक ड्रीम युगा मोटारसायकल (एमएच १२ एमएस ५८८९) असा एकूण २२ लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news