Khadakwasla Dam Water Release: खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांतून विसर्ग सुरू; ४० दिवसांत २२ टीएमसी पाणी सोडले

खडकवासलातून मुठा नदीत १,७१२ क्युसेक पाणी; धरणसाखळीत शंभर टक्के पाणीसाठा
Khadakwasla Dam
Khadakwasla DamPudhari
Published on
Updated on

खडकवासला: घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात शनिवारपासून (दि. १५) पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, ओढे-नाल्यांतून पाण्याची आवक सुरूच असल्याने खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांतून विसर्ग सुरू आहे. खडकवासलातून सध्या मुठा नदीपात्रात १ हजार ७१२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणसाखळीत सध्या शंभर टक्के पाणीसाठा आहे.

Khadakwasla Dam
Narhe Dhayari Traffic Jam: नऱ्हे-धायरीत वाहतूक कोंडीचा कहर; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

गेल्या चाळीस दिवसांत खडकवासला धरणातून तब्बल २२ टीएमसी पाणी सोडण्यात आले. यातील १५.८७ टीएमसी पाणी मुठा नदीत, तर जवळपास ६ टीएमसी पाणी मुठा कालवा व बंदिस्त जलवाहिन्यांतून पिण्यासाठी सोडण्यात आले.

Khadakwasla Dam
Rahu Electric Shock Death: वीजेचा धक्का बसून दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू; राहू परिसरात शोककळा

वरसगावमधून सध्या ६००, पानशेत १ हजार ५८० आणि टेमघरमधून ५७२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. या तिन्ही धरणांच्या विसर्गाची भर खडकवासलात पडत आहे. पिण्यासाठी मुठा कालवा व बंदिस्त जलवाहिन्यांत पुरेशा प्रमाणात पाणी सोडले जात आहे. या पाण्याची तूट भरून खडकवासला शंभर टक्के भरून वाहत आहे. त्यामुळे मुठा नदीत अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे.

Khadakwasla Dam
Pune Street Photography: पुण्याच्या गल्ल्यांपासून सोशल मीडियापर्यंत; तरुणाईला ‘स्ट्रीट फोटोग्राफी’ची भुरळ

जून महिना कोरडा जाऊनही चार-पाच दिवसांचा अपवाद वगळता १ जुलैपासून धरणक्षेत्रात सलगपणे पाऊस सुरू आहे. अद्यापही धरणक्षेत्रात पावसाळी वातावरण कायम आहे. पावसाचा जोर कमी झाला असला, तरी घाटमाथ्यासह डोंगरी पट्ट्यात श्रावण सरींबरोबर रिमझिम सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. १८) दिवसभरात पानशेत येथे ११, वरसगाव येथे १३, टेमघर येथे ४ व खडकवासला येथे १ मिलिमीटर पाऊस पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news