Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरण उघड; शिरूरमध्ये ‘गुरू’च्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा

सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उघड; अनेक मातब्बरांची फसवणूक झाल्याची माहिती समोर
Ashok Kharat Case
Ashok Kharat CasePudhari
Published on
Updated on

निमोणे: अंकशास्त्रात माहीर असणारा तथाकथित आध्यात्मिक गुरू अशोक खरात याच्या रासलीला सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची धग थेट शिरूर तालुक्याला लागली आहे. या हाय प्रोफाईल तथाकथित धर्मगुरूच्या नादी लागून शिरूर तालुक्यातील अनेक मातब्बर लाखो रुपयांना डुबले असल्याची रंजक माहिती आता हळूहळू उघड होऊ लागली आहे.

Ashok Kharat Case
Maharashtra Anti Superstition Demand: भोंदूबाबा प्रकरणावर कारवाईची मागणी; अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याची गरज

कोट्यवधी रुपयांमध्ये खेळणाऱ्या काही आसामी आता कोटी नको, अरबो-खरबो रुपयांत आपण खेळले पाहिजे, राजकारणात आपला वारू तुफान धावला पाहिजे, यासाठी खरातच्या नादी लागले आणि बुडाले, हे आता उघड झाले आहे.

Ashok Kharat Case
Pune Summer Special Trains: पुण्यातून उन्हाळी विशेष गाड्या; रेल्वेच्या 306 फेऱ्या, एसटीच्या 74 जादा बस

मुळातच कॅप्टन खरातकडे शिरूर तालुक्यातील जे भक्त जात होते, त्यांची कुंडली काढल्यानंतर ही सगळी मंडळी हाय प्रोफाईल मनी आणि मसल पॉवरवर प्रचंड पकड असणारी व त्यांच्या भागातील मातब्बर अशीच माणसे आहेत. शिरूर तालुक्यातील एका नामांकित राजकीय नेत्यावर खरात याने नाशिक जिल्ह्यातील वावी पोलिस ठाण्यात पाच कोटी रुपये मागतो, अशा पद्धतीचा गुन्हा काही दिवसांपूर्वी दाखल केला.

Ashok Kharat Case
Baramati By Election Congress: बारामती पोटनिवडणूक; राष्ट्रवादी न लढल्यास काँग्रेस मैदानात

मात्र, याची दुसरी बाजू अशी आहे, तो नामांकित राजकीय नेता मनोभावे खरात याच्या आश्रमात मोठ्या श्रद्धेने जात होता. गंडा-दोरा किंवा अंगठीतले खडे ज्याची किंमत बाजारात अवघी शे-दोनशे रुपये आहे असे खडे कॅप्टन खरात याने कमीत कमी अडीच लाख व जास्तीत जास्त कितीही, या दराने या भक्तांना घेण्यास भाग पाडले.

Ashok Kharat Case
Pune IMD Digital Observatory: पुण्यात 151 वर्षांची वेधशाळा डिजिटल; थर्मामीटरला रामराम

नाव न छापण्याच्या अटीवर अनेक जण आता

दै. ‌‘पुढारी‌’शी मनमोकळे बोलू लागले आहेत. राजकारणात भरभराट व्हावी, आर्थिकदृष्ट्या स्थैर्य यावे यासाठी या हाय प्रोफाईल महाराजाच्या दरबारात अनेक जणांनी माथा टेकवला. त्याच्या आश्रमात एका सिक्रेट रूममध्ये तंत्रविद्या करण्यासाठी त्यांने अतिशय भारावलेले वातावरण निर्माण केले होते, साक्षात परमेश्वराशी त्याचे थेट कॉन्टॅक्ट असल्याचे तो भासवत होता, विजेच्या उपकरणावर चालणारा खरा भासणारा नाग तो त्या विधीदरम्यान भाविकभक्तांना दाखवत असल्याने प्रत्येक जण मोहित होत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news