अठराविश्व दारिद्य्र, आर्थिक परिस्थिती बेताची…… तरीही जिद्दीने बनली गावातील पहिली महिला पोलिस

अठराविश्व दारिद्य्र, आर्थिक परिस्थिती बेताची…… तरीही  जिद्दीने बनली गावातील पहिली महिला पोलिस
Published on
Updated on

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा :  घरी अठराविश्व दारिद्य्र, आर्थिक परिस्थिती बेताची. मात्र, तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील संगीता रामदास सोनवणे हिने नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत घवघवीत यश मिळविले. तिने गावातून पहिली महिला पोलिस होण्याचा बहुमान प्राप्त केला. पालघर पोलिस दलात निवड झालेल्या संगीता सोनवणे यांनी या यशाबद्दल बोलताना सांगितले की, सुरुवातीपासून घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अनेकदा मोलमजुरी करावी लागली. कोणाचेही पाठबळ नसताना शिक्षण घेतले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मांडवगण फराटा येथून घेतल्यांनतर शिरूर येथील सी. टी. बोरा महाविद्यालयात उच्च शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर पुणे शहरात आयटी पार्कमध्ये नोकरी केली. सुरुवातीपासून पोलिस दलात जायचे स्वप्न होते. त्यामुळे नोकरी करत असताना पोलिस भरतीचा अभ्यास सुरू केला. सातत्य ठेवले. सहकार्‍यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीतून पालघर पोलिस दलात निवड झाली. या यशात आई रखमाबाई व वडील रामदास यांचा मोठा वाटा असल्याचे संगीता सोनवणे यांनी सांगितले. शेतात कांदा काढणी सुरू असताना मुलगी पोलिस झाल्याची वार्ता कळताच आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले. या वेळी संगीता यांचे वडील रामदास यांनी म्हणाले, अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना मुलगा-मुलगी हा भेदभाव कधी केला नाही.

आज मुलीने गावात पहिली महिला पोलिस होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. हा आमच्या कुटुंबासाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे.
संगीता यांच्या यशाबद्दल कोल्हाटी बुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल कदम, जयदीप पवार, पोलिस निरीक्षक युनूस शेख, पोलिस
निरीक्षक अरविंद माने, सरपंच ज्योती जाधव, नरेंद्र माने, प्रा. सचिन आवारे आदींसह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news