Political News Indapur: इंदापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष टिकवला- शेखर वढणे

प्रवीण मानेंच्या पक्ष प्रवेशाने ताकद वाढली
Political News Indapur
इंदापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष टिकवला- शेखर वढणेPudhari
Published on
Updated on

इंदापूर: इंदापुरात भारतीय जनता पक्षामध्ये 2024 च्या निवडणुकीच्या तोंडावर येथील नेत्यांनी अचानक पक्ष बदलला; मात्र स्थानिक पदाधिकार्‍यांनी, कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून पक्ष टिकवला. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांच्या पक्ष प्रवेशाने पक्षात खूप मोठी ताकद निर्माण झाली आहे.

याचा पुढील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा तसेच लोकसभेला आम्हाला फायदा मिळणार असून ’बुथ जितो चुनाव जितो’प्रमाणे काम करणार असल्याचे भाजपचे दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी सांगितले. (Latest Pune News)

Political News Indapur
Manchar Market Update: मंचरमध्ये भुईमूगाचा भाव वाढला; भाजीपाला आवकेमध्ये लक्षणीय घट

सोमवारी (दि. 7) आयोजित प्रवीण माने यांच्या पक्ष प्रवेशानंतर कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. वढणे म्हणाले, जुना-नवा भेदभाव आम्ही तिथेच सोडून दिला असून, कार्यकर्त्यांनी हातात हात घालून पक्ष वाढीसाठी काम करावे. प्रत्येक निवडणुकीत आमचा इंदापूरला उमेदवार उभा असेल. हर्षवर्धन पाटील यांची देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा असल्याचे विचारल्यानंतर ते प्रवेश करतील किंवा नाही आमच्यापर्यंत कसलाही निरोप नाही, असे त्यांनी सांगितले.

प्रवीण माने म्हणाले, इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप प्रवेश केला आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मुख्यमंत्री यांनी आम्हाला तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात असे सांगत तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवू, असे आश्वासित केले आहे.

Political News Indapur
Baramati Gram Panchayat: बारामतीतील 51 ग्रामपंचायतीचा कारभार महिलांकडे जाणार

तालुक्यात विद्युत रोहित्र, रस्त्याचे प्रश्न आहेत. याबरोबरच सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. ऑगस्ट महिन्यात इंदापुरात मुख्यमंत्री शेतकरी मेळाव्यास येणार आहेत.

या वेळी आकाश कांबळे, बाबासाहेब चवरे, गजानन वाकसे, तेजस देवकाते, राजकुमार जठार, राम आसबे, माऊली वाघमोडे, मारुती वनवे, नानासाहेब शेंडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news