Baramati Gram Panchayat: बारामतीतील 51 ग्रामपंचायतीचा कारभार महिलांकडे जाणार

तालुक्यातील 99 ग्रा.पं.च्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर; काही ठिकाणी इच्छुकांच्या अपेक्षेवर फिरले पाणी
Baramati Gram Panchayat
बारामतीतील 51 ग्रामपंचायतीचा कारभार महिलांकडे जाणारPudhari
Published on
Updated on

बारामती: बारामती तालुक्यातील 99 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण सोमवारी (दि. 7) जाहीर करण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील 51 ग्रामपंचातींचा कारभार महिलांकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे आरक्षणामुळे अनेक गावांतील इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याचेही दिसून आले.

येथील कविवर्य मोरोपंत सभागृहात सरपंचपदाची आरक्षण सोडत तहसीलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. (Latest Pune News)

Baramati Gram Panchayat
DJ Free Ganesh Festival: डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार; डिजे लावणाऱ्या गणेश मंडळांना मदत नाही

प्रवर्गनिहाय आरक्षण व ग्रामपंचायत पुढील प्रमाणे : अनुसूचित जाती महिला - कोळोली, मासाळवाडी, खराडेवाडी, तरडोली, सोनवडी, सुपे, वढाणे, चौधरवाडी. अनुसूचित जाती - मोराळवाडी, सदोबाचीवाडी, आंबी खुर्द, काळखैरेवाडी, सोरटेवाडी, पळशी, मगरवाडी.

अनुसूचित जमाती महिला : सोनगाव.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : म्हसोबानगर, निंबोडी, कटफळ, मुढाळे, होळ, करंजे, लाटे, शिरवली, जराडवाडी, जळगाव कडेपठार, माळेगाव खुर्द, सांगवी, दंडवाडी, मानाप्पावस्ती. नागरिकांचा मागास प्रवर्ग : भिलारवाडी, पानसरेवाडी, कुतवळवाडी, लोणी भापकर, कोरहाळे खुर्द, कन्हेरी, काटेवाडी, गुणवडी, माळवाडी-लाटे, खांडज, मळद, को?हाळे बुद्रुक, जोगवडी.

Baramati Gram Panchayat
Pune Road Accidents: पुणे सातारा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका; काहींचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी

सर्वसाधारण महिला : नारोळी, सुपा, चांदगुडेवाडी, बाबुर्डी, जैनकवाडी, मेडद, सायंबाचीवाडी, क?हावागज, ढाकाळे, मोढवे, वाकी, वडगाव निंबाळकर, सस्तेवाडी, खंडोबाचीवाडी, वाघळवाडी, मुरुम, पाहुणेवाडी, पणदरे, धुमाळवाडी, शिरष्णे, कांबळेश्वर, वंजारवाडी, झारगडवाडी, मेखळी, घाडगेवाडी, बरा्हणपूर, वाणेवाडी, थोपटेवाडी, डोर्लेवाडी.

सर्वसाधारण : भोंडवेवाडी, आंबी बुद्रुक, मोरगाव, का?हाटी, देऊळगाव रसाळ, जळगाव सुपे, शिर्सूफळ, साबळेवाडी, पारवडी, गाडीखेल, उंडवडी सुपे, कारखेल, उंडवडी कडेपठार, गोजूबावी, मुर्टी, माळवाडी- लोणी, अंजनगाव, गडदरवाडी, निंबुत, करंजेपूल, सोनकसवाडी, पवईमाळ, कुरणेवाडी, निरावागज, सावळ, पिंपळी, ढेकळवाडी, चोपडज.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news