राऊत यांना मत मांडण्याचा अधिकार: शरद पवारFile Photo
पुणे
Political News: राऊत यांना मत मांडण्याचा अधिकार: शरद पवार
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका सांगण्यासाठी केंद्राने स्थापलेल्या शिष्टमंडळावर खा. संजय राऊत यांनी टीका केली होती.
बारामती: आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका सांगण्यासाठी केंद्राने स्थापलेल्या शिष्टमंडळावर खा. संजय राऊत यांनी टीका केली होती. यासंबंधी ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, यापूर्वी नरसिंह राव पंतप्रधान असताना युनोमध्ये महाराष्ट्राचे शिष्टमंडळ अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात गेले होते. त्यात माझा सहभाग होता. आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्या वेळी येतात त्या वेळी पक्षीय भूमिका घ्यायची नसते.
पहलगाम दहशतवादी हल्ला व पाकिस्तानचे उद्योग, यासंबंधी ही शिष्टमंडळे देशाची भूमिका मांडणार आहेत. राऊत यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. पण, त्यांच्याही पक्षाचा एक सदस्य शिष्टमंडळात आहे. इथे स्थानिक राजकारण आणू नये, अशी आमची भूमिका असल्याचे पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.(Latest Pune News)

