Sharad Pawar Health Update: शरद पवार पुण्यातील रुबी रुग्णालयामध्ये दाखल, प्रकृती स्थिर

प्रकृती स्थिर असल्याची सुप्रिया सुळेंची माहिती
Sharad Pawar Health Update
Sharad Pawar Health UpdatePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.

शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. यासंदर्भात त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया स्टेटसद्वारे अधिकृत माहिती दिली आहे. "बाबांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. त्यांचे सर्व पॅरामीटर्स (आरोग्य निकष) स्थिर असून प्रकृतीबाबत पुढील माहिती वेळोवेळी दिली जाईल," असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या आवश्यक त्या चाचण्या केल्या जात आहेत. पवार रुग्णालयात दाखल झाल्याचे समजताच महाविकास आघाडीसह विविध पक्षांतील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस सुरू केली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याने कार्यकर्त्यांनी काळजी करू नये आणि रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Sharad Pawar Health Update
Ujani Data Centre Controversy: ‘प्रकल्प आला म्हणजे पाणी गेले असे नाही’, उजनीतील डेटा सेंटर बाबत शरद पवारांची नरमाईची भूमिका

दरम्यान सोमवारी संध्याकाळी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत रुबी रुग्णालयाकडून अधिकृत वैद्यकीय पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. छातीत दुखू लागल्यामुळे (Pleuritic Pain) शरद पवार यांना सर्वसाधारण तपासणी आणि वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ, चेअरमन आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ के. ग्रँट यांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, ‘शरद पवार यांना छातीत दुखू लागल्याची तक्रार केल्यानंतर, सर्वसाधारण आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय देखरेखीसाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती लवकरच पूर्ववत होईल अशी अपेक्षा असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.