Sharad Pawar Health : शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; पुढील तपासण्यांसाठी ॲडमिट केल्याची सुप्रिया सुळेंची माहिती

रूबी रुग्णालयातून मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला होता.
Sharad Pawar
Sharad PawarPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील उपचार व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील वैद्यकीय चाचण्यांसाठी (Further Investigations) त्यांना तातडीने मुंबईत आणून ॲडमिट करण्यात आले आहे.

शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून केवळ आवश्यक चाचण्या रुग्णालयात दाखल राहूनच करणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांचे स्टेटस

दरम्यान, शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया स्टेटसच्या माध्यमातून यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, ‘पुढील तपासण्यांसाठी आम्ही बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करत आहोत. तुमच्या सर्वांच्या सदिच्छांसाठी मनापासून धन्यवाद.‘

पुढील एक-दोन दिवसांत ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्या विविध आरोग्य चाचण्या पूर्ण केल्या जातील. तपासण्यांचे सर्व अहवाल आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी काळजी करू नये तसेच रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.