शरद मोहोळ खून प्रकरण : गुंड विठ्ठल शेलारसह अकरा जण ताब्यात

शरद मोहोळ खून प्रकरण : गुंड विठ्ठल शेलारसह अकरा जण ताब्यात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शरद मोहोळ खून प्रकरणात आराेपीला पोलिसांनी नवी मुंबईतून ताब्यात घेतले आहे. एकूण सहा जणांना पोलिसांनी नवी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे त्यामध्ये रामदास मारणे, विठ्ठल शेलार या दोघांचा त्यामध्ये समावेश आहे. तर पुण्यातून चौघांना पकडण्यात आले आहे. खून प्रकरणात मारणेसह आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे.

५ जानेवारी रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात मोहोळवर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आला होता. मोहोळचा साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी खून केला होता. खून प्रकरणात दोन वकिलांना अटक करण्यात आली आहे. खून प्रकरणाचा तपास सुरू असताना. आरोपी रामदास मारणे नवी मुंबई परिसरातील एका फार्म हाऊसवर असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला नवी मुंबईतून अटक केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news