कोरेगाव पार्क येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

कोरेगाव पार्क येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
Published on
Updated on

पुणे : कोरेगाव पार्कमधील उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या लेन नंबर 7 मध्ये हेल्थ लॅड क्लिनिक व थाई स्पा व हेल्थ स्पॉट क्लिनिकच्या नावाखाली सुरू असणार्‍या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हा छापा टाकून पाच महिलांची सुटका केली. त्यात तीन परदेशी व दोन भारतीय महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
प्रशांत रामकृष्ण दंडगे (रा. ताडीवाला रोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात एकावर पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेन नंबर 7 मधील एका सोसायटीत हेल्थ अँड क्लिनिक थाई स्पा व हेल्थ स्पॉट क्लिनिक थाई स्पाच्या नावाखाली महिलांना ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा 5 महिलांची सुटका करण्यात आली. तर, प्रशांत दंडगे याला पकडण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या महिलांना रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, महिला अंमलदार मनीषा पुकाळे, रेश्मा कंक, अमेय रसाळ, ओंकार कुंभार व त्यांच्या पथकाने केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news