

विठ्ठलवाडी; पुढारी वृत्तसेवा : जलशुद्धीकरण केंद्राशेजारी असलेल्या गणेशमळा सिग्नल चौकालगत ड्रेनेजलाइन तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर साठलेले आहे. कित्येक दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जवळच एक मोठा गतिरोधक असून, रस्त्यावरील सांडपाण्यामुळे अनेक दुचाकी वाहने पडून चालक जखमी झाले आहेत. सुरक्षा भिंतीलगत कचर्याचे ढीगही पडले आहेत. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे दुचाकीस्वार व पादचार्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ड्रेनेजची वेळच्या वेळी साफसफाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.