SET Exam 2026: SET परीक्षा पुढे ढकलली; 26 जुलैऐवजी 6 सप्टेंबरला होण्याची शक्यता

MPSC परीक्षा आणि आषाढी वारीमुळे निर्णय; 1.11 लाखांहून अधिक उमेदवारांना दिलासा
SPPU
SPPUPudhari
Published on
Updated on

पुणे: सहायक प्राध्यापक पदासाठी २६ जुलै रोजी प्रस्तावित असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा, आषाढी वारीमुळे उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, ६ सप्टेंबर ही परीक्षेची संभाव्य तारीख जाहीर केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली.

SPPU
Alandi Palkhi Departure: आळंदी पालखी प्रस्थानापूर्वी दिलासा; इंद्रायणीवरील पुलांवरील पाणी ओसरले, पर्यायी मार्गही तयार

महाराष्ट्र, गोवा राज्यात वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक, तसेच पीएच.डी.साठी आवश्यक ४१ व्या सेट परीक्षेचे आयोजन विद्यापीठातर्फे यंदा करण्यात येत आहे. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरतीअंतर्गत विविध विषयांच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत.

SPPU
Katraj Milk Dairy: कात्रज दूध संघातील कथित आर्थिक अनियमिततेचा मुद्दा विधान परिषदेत; योगेश टिळेकरांच्या मागणीने राजकीय चर्चा

सेट परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे उमेदवारांना कोणत्याही एकाच परीक्षेला उपस्थित राहता येईल, त्यामुळे त्यांचे नुकसान होईल. तसेच, ७ जुलै, २०२६ ते २५ जुलै या काळात आषाढी वारी असल्याने २६ जुलै रोजी परीक्षा घेतल्यास वाहतुकीची गैरसोय होऊन परीक्षा नियोजन आणि उमेदवारांना परीक्षेसाठी वेळेत पोहोचण्यात गैरसोय निर्माण होण्याची शक्यता आहे.

SPPU
Dhayari Flyover Crack: धायरी फाटा उड्डाणपुलाला भेग पडल्याची चर्चा; महापालिकेचा खुलासा, 'पूल पूर्णपणे सुरक्षित'

या दोन्ही पार्श्वभूमीवर २६ जुलै रोजीची सेट परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निवेदने प्राप्त झाली आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेट परीक्षेपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी २६ जुलै रोजी आयोजित केलेल्या सेट परीक्षेची संभाव्य तारीख ६ सप्टेंबर २०२६ अशी जाहीर केली आहे.

SPPU
Pune Extortion Case: पुण्यात 50 कोटींच्या खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; कथित बिष्णोई टोळीशी संबंधित तिघे अटकेत

सेट परीक्षेसाठी १ लाखांवर अर्ज

सेट परीक्षेसाठी १ लाख १७ हजार ७०८ उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्यापैकी १ लाख ११ हजार ७११ उमेदवारांनी शुल्क भरून अर्ज पूर्ण केले आहेत. अर्ज भरण्याची मुदत आता पूर्णपणे संपलेली आहे. शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अजून वाढू शकते कारण बँकाकडून आणखी दोन दिवस खात्याचे अपडेशन चालू राहणार असल्याचे देखील विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news