SET 2026 Exam Date: SET 2026 परीक्षेच्या तारखेत मोठा बदल; आता २५ ऑक्टोबरला होणार ४४ वी परीक्षा!

२७ सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; अनंत चतुर्दशी आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या पार्श्वभूमीवर निर्णय, उमेदवारांना तयारीसाठी अतिरिक्त वेळ
SPPU
SPPUPudhari
Published on
Updated on

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २०२६ च्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी दि. २७ सप्टेंबरला नियोजित असलेली ४४ वी सेट परीक्षा आता दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या सेट विभागामार्फत देण्यात आली आहे.

SPPU
Engineering Admission Extension: अभियांत्रिकी प्रवेशाला मुदतवाढ नाही; ४० ते ४५ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाकडून सहाय्यक प्राध्यापक तसेच पी.एचडी.साठी सेट परीक्षा महाराष्ट्र आणि गोवा राज्यात घेण्यात येते. विद्यापीठाने यापूर्वी २७ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते.

SPPU
Mandai Metro Station: गणेशोत्सवात मंडई मेट्रोस्थानकावर ‘वन-वे’; गेट ३ मधून प्रवेश, गेट २ मधून बाहेर पडता येणार!

परंतु, केंद्रीय लोकसेवा आयोगासह अन्य स्पर्धात्मक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने परीक्षांच्या तारखांमध्ये मोठ्या प्रमाणावर एकाचवेळी येणारी स्पर्धा निर्माण झाली. त्यातच २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असल्याने उमेदवारांना प्रवास तसेच परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर परीक्षा विभागाकडे उमेदवारांकडून आलेल्या निवेदनांचाही विचार करण्यात आला.

SPPU
Pune Ganeshotsav Traffic: गणेशोत्सवात पुण्याच्या पेठांमध्ये मालवाहतुकीला वेळेचे बंधन; पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच परवानगी!

उमेदवारांच्या हिताचा तसेच परीक्षा आयोजनातील सोयीचा विचार करून विद्यापीठाने पूर्वनियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी ४४ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) घेण्यात येणार आहे.

SPPU
Otur Rural Hospital: सुसज्ज इमारत, अत्याधुनिक सुविधा; तरी ओतूर ग्रामीण रुग्णालय ‘मनुष्यबळाअभावी’ आजारी!

परीक्षेच्या तारखेत झालेला हा बदल सर्व संबंधित परीक्षार्थी, परीक्षा संपर्क प्रमुख तसेच परीक्षा आयोजनाशी संबंधित यंत्रणांना लागू राहणार आहे. उमेदवारांनी बदललेल्या तारखेची नोंद घेऊन त्यानुसार परीक्षेची तयारी आणि प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन सेट परीक्षा विभागाकडून करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळातील प्रवासाची संभाव्य अडचण टाळण्याबरोबरच उमेदवारांना परीक्षेच्या तयारीसाठीही अतिरिक्त वेळ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news