September Rain Forecast: सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ; देशावर दुष्काळाचे सावट?

ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा १६ टक्के कमी पाऊस; सप्टेंबरमध्ये ९१ टक्के पावसाचा अंदाज, महाराष्ट्रातही चिंता
Rain
RainPudhari
Published on
Updated on

पुणे: देशात ऑगस्ट महिन्यात तुटीसह गेल्या तीन महिन्यात सरासरीलच्या १३.८६ टक्के तुटीचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्यात देखील सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने सोमवारी वर्तविली आहे. यंदा मान्सूचा हंगाम तोट्यात जाणार असून, देश आता तीव्र दुष्काळाच्या गर्तेत सापडण्याचे संकेत दिसून येत आहेत.

Rain
Sassoon Hospital ICU Beds: ससूनमध्ये ICU बेड फुल्ल; दररोज ५ ते ६ गंभीर रुग्ण प्रतीक्षेत

जून ते सप्टेंबर हा या महिन्याचा कालावधी मान्सूनचा असतो. या कालावधीतील पावसामुळे शेती, पिण्याचे पाणी, व्यवसाय अवलंबून आहे. यंदाचे वर्ष हे अल निनोचे वर्ष मानले जात आहे. प्रशांत महासागरात अल निनो वाढीस लागला. त्यामुळे जून तसेच जुलै महिन्यात देशभरात तुटीचा पाऊस नोंदविला गेला. ऑगस्ट माहिन्यात देखील देशात सरासरीच्या १६ टक्के कमी पाऊस नोंद झाला असून, गेल्या तीन महिन्यांचा विचार करता, देशात १३.८६ टक्के तुटीचा पाऊस पडला आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या ९१ टक्के पावसाची शक्यता सोमवारी वर्तविली. त्यामुळे यंदाचा हंगाम तोट्यात जाणार असून, देश दुष्काळाच्या गर्तेत सापडण्याचे संकेत आहेत.

Rain
Pune Crime: एक कोटींच्या रोकड लुटीचा प्रयत्न; फरार पोलिस हवालदार जालन्यात अटकेत

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांचा विचार करता, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, तामिळनाडू, आंध, राजस्थान, पंजाब, बिहार, आसाम, मेघालय, मणीपूर, अरूणाचाल प्रदेशमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद आहे, त्याखालोखाल महाराष्ट्र, गुजरात मध्यप्रदेश, तेलंगणा, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली ,उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमध्ये सरासरी सरासरीच्या आसपास पाऊस बरसला आहे. केवळ लडाख आणि ओडिशामध्ये पावसाची स्थिती ठिकठाक आहे.

Rain
Bopdev Ghat Case: बोपदेव घाट सामूहिक बलात्कार खटला; हॉटेलमालकाची न्यायालयात साक्ष

ऑगस्टमध्ये देखील पाऊस कमी

ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रासह एकूण १५ राज्यांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओडिशा, बिहार वगळता गंगेलच्या खोऱ्यातील राज्यासह पूर्वोत्तर भारतातील काही राज्यांत पावसालाी स्थिती बरी आहे.

Rain
Pune Narcotics Case: अल्पवयीन मुलामार्फत गांजाची विक्री; हडपसरमध्ये २१ किलो गांजा जप्त

सप्टेंबर महिन्यात पावसाची ओढ

सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीच्या केवळ ९१ टक्के पावसाचाअंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामध्ये पूर्वोत्तर भारत, पूर्व भारत, लडाख, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, दक्षिण बिहार, ओडिशा,पश्चिम बंगाल, उत्तर तामिळनाडूच्या काही भागात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे,

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकात पाऊस नाही

दरम्यान सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र, गोवा कर्नाटकातसह संपूर्ण पश्चिम किनारपट्टी, दक्षिण भारत, वायव्य भारतात सरासरीपेक्षा पाऊस कमी राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news