शारदा ज्ञान पीठमचे संस्थापक, ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ यांच वृद्धापकाळाने वयाच्या ९४ व्या वर्षी पुण्यात निधन झाले. शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे .
गाडगीळ हे झपाटलेले व्यक्तिमत्व होते टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत विषयात पदवीपर्यंतचे अध्ययन, शारदा ज्ञानपीठाची स्थापना, संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी केलेला प्रयास आणि त्यासाठी अमेरिका, आफ्रिकेमध्ये अनेक वेळा त्यांनी प्रवास केला होता. पं. वसंतराव गाडगीळ यांनी प्रत्येक वर्षी पुण्यात ऋषीपंचमी निमित्त ८० वर्षांवरील तपस्वी, विद्वान, निरनिराळ्या क्षेत्रांत सातत्यानं विधायक कार्य करणाऱ्या पुण्यातील व पुण्याबाहेरील नामवंत व्यक्तींचा सत्कार ते घडवून आणत. ते संस्कृत भाषे विषयी नेहमी आग्रही असतं ते भाषण संस्कृतमध्येच करीत असत. प्रचिन ग्रंथ वेद उपनिषदे यांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारासाठी शारदा संस्कृत नावाने ते मासिक चालवत होते .