

पुणे, पुढारी वृत्तसेवा: बँजो व्हॅनने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वार जेष्ठांचा मृत्यू झाला. फारुक अहमद मोहमद शेख (वय.60,रा. गणेश पेठ) असे मृत्यू झालेल्या जेष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी, खडक पोलिसांनी बँजो व्हॅन चालक अमन फिरोज खान याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याबाबत मुलगा फिरोज शेख (वय.37) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी साडे 9 वाजताच्या सुमारास गंज पेठ मच्छी आळी येथील सार्वजनिक रस्त्यावर घडली आहे.
फिर्यादींचे वडील हे दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी बँजोचालकाने वाहतुकींच्या नियमांकडे दुर्लक्ष करत त्यांच्या वडिलांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जी.बी.म्हस्के करीत आहेत.