पुणे : गोवर लसीकरणाचा उद्यापासून दुसरा टप्पा

पुणे : गोवर लसीकरणाचा उद्यापासून दुसरा टप्पा
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिका कार्यक्षेत्रात गोवर रुबेला आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. याअंतर्गत 15 जानेवारीपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. याअंतर्गत वंचित मुलांना एमआरची लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात साधारणपणे 1600 मुलांना लसीकरण करण्यात आले.

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 13 जानेवारी रोजी गोवर प्रतिबंधक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत गोवर रुबेला लस न घेतलेल्या जास्तीत जास्त बालकांचे लसीकरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. शहरातील 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यासाठी शहरात विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहीम आयोजित करण्यात येत आहे.

शहरात 15 ते 25 जानेवारी या कालावधीत विशेष लसीकरण मोहिमेची दुसरी फेरी आयोजित करण्यात येत आहे. 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. पालकांनी बालकांना लसींचा डोस त्वरित घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news